मये मतदारसंघात गोवा फॉरवर्डचाच उमेदवार जिंकणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचा उमेदवार मये मतदारसंघात निवडून आणण्याचा संकल्प गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मये :  आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचा उमेदवार मये मतदारसंघात निवडून आणण्याचा संकल्प गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मये मतदारसंघातील कार्यकर्ते व गोवा राज्य कार्यकारिणी सदस्यांची रविवारी मये येथील महामाया वाचनालयात थिवी मतदारसंघाचे माजी आमदार तसेच गोवा फॉरवर्ड पक्षात नुकतेच प्रवेश केलेले किरण कांदोळकर यांच्या  मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झाली.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना कांदोळकर म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचा उमेदवार मये मतदारसंघात निवडून आणण्याचा संकल्प गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

बुथ कार्यकारिणी विषयी माहिती देताना ते म्हणाले, की एकूण ४४ बुथ समित्यांपैकी २४ समित्यांची निवड आतापर्यंत झाली असून उर्वरित २० बुथ समितीची निवड डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे, जेणेकरून जानेवारी २०२१ पासून पक्ष त्यांच्या अजेंड्याचे काम हाती घेऊ शकेल.
संतोषकुमार सावंत यांनी सांगितले, की गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे सर्व आजी माजी सरपंच, पंच सदस्य आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महिला, युवा आणि इतर प्रकारच्या समित्या स्थापन करण्यासॆ लवकरच मये मतदारसंघाला भेट देतील व यावेळी स्थानिकांच्या विविध समस्या तसेच विकासकामांबद्दल उहापोह होणार आहे.

 आगामी निवडणुकीचा गोवा फॉरवर्ड पक्ष आपला राजकीय अजेंडा लवकरच जाहीर करणार असून मयेचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये यांनी अजेंड्यात जाहीर केलेली आतापर्यंत किती कामे पूर्ण केली हे ठामपणे सांगावे.
पत्रकार परिषदेस गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मये गटाचे अध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर, युवा अध्यक्ष समरेश वायंगणकर, उत्तर गोव्याचे जिल्हाध्यक्ष अनंत पार्सेकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत आदी मंडळी उपस्थित होती.

संबंधित बातम्या