Goa: भाजपचे सरकार हवे की नको याचा कौल देण्याची वेळ आली आहे; विजय सरदेसाई

जनतेला हे सरकार नको झाले आहे, जनतेने आपला आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे.
Goa: भाजपचे सरकार हवे की नको याचा कौल देण्याची वेळ आली आहे; विजय सरदेसाई
Goa Forward Party chief Vijay SardesaiDainik Gomantak

पणजी: राज्यातील भाजप सरकार विरोधी जनमत तयार करण्यासाठी गणेश चतुर्थी नंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) प्रत्येक मतदारापर्यंत (voter) जाण्याची मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. लोकांनीच आता हे भाजपचे (BJP) सरकार हवे की नको याचा निर्णायक कौल देण्याची वेळ आली आहे असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत (today's press conference Goa ) सांगितले.

Goa Forward Party chief Vijay Sardesai
Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर
Goa Forward Party chief Vijay Sardesai in Press conference
Goa Forward Party chief Vijay Sardesai in Press conferenceDainik Gomantak

पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीनंतर त्यानी माध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसने भाजप विरोधी मतांची विभागणी होणार नाही याची दक्षता घेणे जरुरीचे आहे. भाजप विरोधी मते फुटली नाहीत तर भाजप विधानसभा निवडणुकीत आमदारांची दोन आकडी संख्या हे गाठू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. जनतेला हे सरकार नको झाले आहे, जनतेने आपला आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या विरोधात सर्व पक्षाने गोव्यातील एक प्रमुख आघाडी तयार करून एकत्र येणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com