गोवा फॉरवर्ड पक्ष गोव्याच्या जनतेचा: किरण कांदोळकर
गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, वास्को ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेताना.Dainik Gomantak

गोवा फॉरवर्ड पक्ष गोव्याच्या जनतेचा: किरण कांदोळकर

कुठ्ठाळी येथील भाजपच्या (BJP) आमदार एलिना साल्ढाणा जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या असून त्याने कोळसा प्रदूषणाला विरोध, रेल्वे दुपदरीकरणाला विरोध केला, म्हणून त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला आहे.

दाबोळी: गोवा फॉरवर्ड पक्ष (Goa Forward Party) दिल्लीचा नसून तो येथील गोव्याच्या जनतेचा आहे. भाजप सरकारने (BJP government) फक्त महागाई वाढवून सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. मुरगाव तालुक्यातून भाजपाचा पराभव निश्चित असून येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपची संख्या ५ किंवा ६ वर येणार असल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी दिली.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, वास्को ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेताना.
Goa: माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी कार्यकर्त्यांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

वास्को येथील ग्रामदेव दामोदराचे दर्शन घेऊन गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, सहसचिव जॉन नाझारेथ यांनी मुरगाव तालुक्‍यात पक्षाच्या कार्याला सुरुवात केली. शुक्रवार (दि.३) गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष कांदोळकर वास्को आले असता त्याने भाजप पक्षावर टीका करताना सांगितले की भाजपने देशातील सामान्य जनतेला महागाईच्या विळख्यात टाकून स्वतःची तिजोरी भरीत आहे. मुरगाव, वास्को, दाबोळी कुठ्ठाळीत भाजपचे वर्चस्व असले तरी येणार्‍या गोवा विधानसभेत त्याचा पराभव निश्चित असल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. मुरगावतून कोळसा हद्दपार करण्यात भाजप सरकार असमर्थ ठरले आहे. भाजप अध्यक्षाने येथे येऊन फक्त जनतेला खोटी आश्वासने तेवढीच दिलेली आहे. जनता त्यांच्या आश्वासनाला यापुढे बळी पडणार नसल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघात गोवा फॉरवर्ड पक्षाने उमेदवार निश्चित केलेले आहे. योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. गोवा फॉरवर्ड पक्ष दिल्लीतून राजकारण करीत नाही. कारण हा पक्ष येथील जनतेचा असल्याने जनतेचे कार्य पुढे नेण्यासाठी पुढाकार घेणार आहे. गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षाने पूर्वीच बारा मतदारसंघात उमेदवार निश्चित केले आहे. इतर पक्षांनी अजूनही आपले उमेदवार घोषित केलेले नाही. यावरून इतर पक्षाची रणनीती कळते असे कांदोळकर यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, वास्को ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेताना.
Goa BJP: राज्यातील कुरबुरी शहांच्‍या कानावर

राज्याचे मुख्यमंत्री सर्व स्तरावर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. जनतेचे कार्य करण्यात असमर्थ असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २८ वरुन त्यांची संख्या ५ किंवा ६ वर येणार असल्याची माहिती किरण कांदोळकर यांनी दिली. राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी महायुती केल्यास गोवा फॉरवर्ड मुरगाव तालुक्यातून दोन जागेवर उमेदवार रिंगणात उतरणार असल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. भाजपकडे येणाऱ्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व नसल्याने त्याचा पराभव निश्चित आहे. भाजपने पर्रीकर यांच्या कुटुंबावर अन्याय केला आहे. पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना पणजीतून उमेदवारी डावलली. मात्र म्हापशातून फ्रान्सिस डिसोजा यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यास पुढाकार घेतला. यावरून भाजपचे पर्रिकर कुटुंबावर किती प्रेम आहे ते संपूर्ण गोव्यातील जनतेला कळून आलेले आहे. कुठ्ठाळी येथील भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या असून त्याने कोळसा प्रदूषणाला विरोध, रेल्वे दुपदरीकरणाला विरोध केला, म्हणून त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना तर या पक्षाने बाजूस करून एका प्रकारे त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला आहे. याला पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याची टीका किरण कांदोळकर यांनी केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, सरचिटणीस दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, वास्को ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेताना.
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

'पत्रकारांना डावलून गोवा फॉवर्डची चहापान'

गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी किरण कांदोळकर, दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, जॉन नाझारेथ वास्कोत आले असता त्यांनी सर्वप्रथम येथील ग्रामदेव दामोदराचे दर्शन घेतले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी वास्कोत येणार अशी गुरुवारी वास्कोतील सर्व पत्रकारांना नवीन व्हॉट्सऍप ग्रुप वरून कळविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता येणार असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात १२:१५ वाजता गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते वास्कोत दाखल झाले. यावेळी त्यांचे स्वागत दामोदर भजनी सप्ताह माजी अध्यक्ष शैलेंद्र गोवेकर यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत दीना लोटलीकर उपस्थित होते. याचवेळी तेथे आपले मामा अकबर मुल्ला यांना भेटण्यासाठी त्यांचा भाचा गोवा प्रदेश काँग्रेस सचिव सैफुल्ला खान मंदिराकडे आले. देवदर्शन करून झाल्यानंतर, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सर्व नेते पत्रकाराचे आभार न मानता सरळ मंदिराच्या बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये चहापान करण्यासाठी निघून गेले. यावरून गोवा फॉरवर्ड पक्षाची पत्रकारावरील प्रेम व त्यांचा आदर किती आहे तो समजतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com