Vijai Sardesai On Mhadei: ...अन्यथा बार्देश, सांगेचा पाणीप्रश्न पेटणार

विजय सरदेसाई यांनी पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांच्यासह म्हादई खोऱ्याला भेट दिली
Mhadei
Mhadei Dainik Gomantak

गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांच्यासह म्हादई खोऱ्याला भेट दिली. यावेळी सरदेसाई यांनी म्हादई खोऱ्यात कर्नाटकने केलेल्या नव्या प्रकल्पासाठीवर ही केरकर यांच्यासोबत चर्चा केली. व गोव्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले.

i basin along with Environmentalist Rajendra Kerkar)

Mhadei
Joseph Sequeira: ‘बिल्डर्स’पासून समुद्रकिनारे वाचवा!

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांच्यासह चोर्ला येथील म्हादई खोऱ्याला भेट दिली. व या ठिकाणी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हालचालीचा मागोवा घेतला. यावेळी सरदेसाई म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास भविष्यात गोव्यातील बार्देश तालुक्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.

या प्रश्नावर सर्व गोवेकरांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात सांगेला ही हा प्रश्न भेडसावणावर असल्याने यावर विचार होणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

Mhadei
CM Pramod Sawant: गोव्यात क्रीडा विद्यापीठ होणार

तसेच ते म्हणाले की आम्ही उभे असलेले पाणी थेट सांखळीत पोहोचते त्यामूळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, हा प्रश्न आपल्या डब्बल इंजिन सरकारच्या आधारे सोडवा कारण हीच योग्य वेळ आहे. असे ते म्हणाले. कारण गोव्याच्या विकासासाठी याचा उपयोग झाला नसल्यास ते काय कामाचे असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com