"मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलेली घोषणा फार्सचं"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

राज्यात ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना तळागाळापर्यंत राबविण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली घोषणा हा फार्स आहे ​

पणजी: राज्यात ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना तळागाळापर्यंत राबविण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली घोषणा हा फार्स आहे असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला.

हल्लीच सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती तेव्हा सिंधुदुर्गवासियांना मोपा विमानतळामुळे गोव्यात पर्यटनासाठी संधी असल्याचे तसेच गोमेकॉ इस्पितळात उपचार मोफत देण्याचे आवाहन केले आहे. गोमंतकियांनाच इस्पितळामध्ये खाटा अपुऱ्या पडत असताना त्यांचे हे वक्तव्य संशयास्पद आहे. सिंधुदुर्गातील जमिनींचा व्यवहार करण्यामध्ये त्यांना रस असल्याचा संशय येतो. भाजपचे कार्यकर्ते गावागावात जाऊन सरकारी नोकऱ्यांसाठी फॉर्म भरून घेऊन बेरोजगार युवा पिढीला आमिषे दाखवत आहेत. २०१२ मध्ये बेरोजगार भत्ता देण्याचे भाजप सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केले त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, त्याचे सरकारने उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली.

गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ -

विजय मल्ल्याकडून गोव्यातील किंगफिशर व्हिला विकत घेणारा अभिनेता गजाआड -

गोव्यात 17 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा -

संबंधित बातम्या