मुख्यमंत्र्यांनंतर आता दुर्गादास कामत यांना धमकीचे संदेश

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे धमकीचे प्रकरण ताजे असतानाच आता फोंड्यातील गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनाही अशाच प्रकारचा खंडणी व धमकीचा संदेश आल्याचे उघड झाले आहे.

फोंडा :  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे धमकीचे प्रकरण ताजे असतानाच आता फोंड्यातील गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनाही अशाच प्रकारचा खंडणी व धमकीचा संदेश आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दुर्गादास कामत यांनी अज्ञाताविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात काल रात्री उशिरा तक्रार नोंदवली आहे. शांतिनगर - फोंडा येथील रहिवासी दुर्गादास कामत यांना अज्ञात व्यक्तीने खंडणीसंबंधी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकी दिलेल्या अज्ञाताचा मोबाईल क्रमांक फोंडा पोलिसांना देण्यात आला आहे. दुर्गादास कामत यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने गेल्या २८ ऑक्‍टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंतच्या काळात हा धमकीचा संदेश पाठवला असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या