गोवा मुक्तीदिनी गोवा फॉरवर्डतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

गोवा मुक्तीदिनी गोवा फॉरवर्ड पक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले

मडगाव: गोवा मुक्तीदिनी गोवा फॉरवर्ड पक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, या दिवशी गोवा फॉरवर्डतर्फे शववाहिका व फिरत्या शवागाराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. 

१९ रोजी सकाळी अकरा वाजता लोहिया मैदानावर गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, स्वातंत्र्य सैनिक, गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर, गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारणिचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित असतील अशी माहिती गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी दिली. 

संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात नवीन शववाहिका व फिरत्या शवागाराचे सरदेसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. 

आणखी वाचा:

गोवा मुक्ति दिवसानिमित्त ५००० गरजूंना अन्नदान -

संबंधित बातम्या