प्रभाग राखीवतेत पुन्हा घोळ झाल्यास  न्यायालयात अवमान याचिका - सरदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

प्रभाग राखीवतेत पुन्हा काही घोळ झाल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे. 

मडगाव : प्रभाग राखीवतेत पुन्हा काही घोळ झाल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मडगाव, म्हापसा, मुरगाव, सांगे व केपे या पाच पालिकांच्या प्रभाग राखीवतेची अधिसूचना सोमवारी जारी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी हा इशारा दिला आहे. 

हरमल समुद्रकिनाऱ्यावर वीस हजार रुपयाचे अंमली पदार्थ जप्त 

प्रभाग राखीवतेच्या नवीन अधिसूचनेकडे गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग राखीवतेत अनियमितता आढळल्यास गोवा फाॅरवर्ड पक्ष न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे. जनतेला धोका देण्याचा पुन्हा प्रयत्न करू नका, तुमची प्रतिष्ठा सांभाळा असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे. 

गोव्यातील नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करा अन्यथा... 

संबंधित बातम्या