Goa University
Goa University Dainik Gomantak

Goa Forward : निकाल लवकर जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार

‘गोवा फॉरवर्ड’ विद्यार्थी शाखेचा विद्यापीठाला इशारा

Goa Forward : राज्यातील विविध महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल गोवा विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेले नाहीत. तो लवकर जाहीर करावा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा गोवा फॉरवर्ड विद्यार्थी शाखेचे राज्य निमंत्रक उद्देश नाईक देसाई यांनी दिला.

निकालासाठी विद्यापीठाचे कुलपती तसेच कुलसचिव यांना 3 ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते, त्यावेळी कुलसचिवांनी लवकर निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, अद्याप निकाल जाहीर केलेला नाही. 14 ऑगस्टपूर्वी निकाल न दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा उद्देश यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Goa University
Vishwajit Rane : आधुनिक गोव्याच्या उभारणीसाठी टीसीपी कायद्यात बदल

निकाल सोमवारपर्यंत जाहीर करणार

गोवा विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात परीक्षांच्या निकालाला उशिर झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ दोन महाविद्यालयांचे निकाल बाकी आहेत. 16 ऑगस्टपर्यंत ते जाहीर होतील असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com