Vijay Sardesai: रामनवमी सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करा; आमदार विजय सरदेसाई यांची मागणी

रामजीवनातील संदेश आजच्या राज्यकर्त्यांनी पाळावा
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

Vijay Sardesai: गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली. काही दिवसांपुर्वीच सरदेसाई यांनी गोवा सरकारवर राम नवमीच्या दिवशी सुट्टी घेऊन अधिवेशाचा एक दिवस कमी केल्यावरून टीका केली होती.

तसेच रामनवमीचा दिवस सुट्टीमुळे कमी केला असला तरी अधिवेशनाचा आणखी एक दिवस वाढवणे शक्य आहे, असेही सरदेसाई म्हटले होते.

Vijay Sardesai
एका डॉक्युमेंटरीने आयुष्य बदलले; कामावरून कमी केलेल्या IT कर्मचाऱ्याला अशी मिळाली गोव्यात नवी प्रेरणा

आमदार सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला हे चांगले ठाऊक असेल की या वर्षी रामनवमी या महिन्याच्या 30 तारखेला येते आणि ती प्रतिबंधित सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे.

भगवान रामावर हिंदूंची श्रद्धा आणि भक्ती आहे आणि त्या दिवशी ज्या उत्साहात उत्सव आणि विधी पाळले जातात, ते पाहता मला वाटते की, त्यांच्या जन्मदिवसाला सरकारांनी आदर आणि महत्त्व दिलेले नाही.

ही विसंगती दुरुस्त करण्यासाठी, आम्ही गोवा फॉरवर्डच्यावतीने मागणी करत आहोत की, आमच्या राज्यात रामनवमी म्हणून साजरा केला जाणारा प्रभू रामाचा जन्म दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर करावा.

Vijay Sardesai
Seafarer In Goa: खलाशी पेन्‍शन योजनेची अर्थसंकल्‍पात तरतूद करा

सरदेसाई पुढे म्हणाले की, भगवान राम हे आदर्श पुरुष आणि न्यायी शासक आहेत. त्यांच्या जीवनाकडे पाहून एखाद्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे, आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत आणि धर्माने जीवन जगले पाहिजे. हाच रामाच्या जीवनातील प्रतीकात्मक संदेश आहे.

समानता, निष्पक्षता आणि न्याय हे तत्त्व त्याच्या राजवटीत होते. ते आजच्या राज्यकर्त्यांनी कायम राखावे आणि त्यांचे अनुकरण करावे अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे मला वाटते की रामनवमीचा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करणे आनंददायी आणि योग्य ठरेल, असे सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com