फ्रान्सिस्को फर्नांडिस यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

मच्छीमारांच्या अनेक समस्या असून या समस्या सोडवण्याची क्षमता गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात असल्याचा आपल्यास विश्वास आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

मडगाव: सागरी कासवांचे रक्षण केल्याबद्दल कौतुकास प्राप्त ठरलेले बाणावलीचे मच्छीमार फ्रान्सिस्को फर्ऩांडिस ऊर्फ पेले यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला आहे. फातोर्डा येथे गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी त्यांचा सदस्यत्व अर्ज स्वीकारून त्यांचे पक्षात स्वागत केले. 

मच्छीमारांच्या अनेक समस्या असून या समस्या सोडवण्याची क्षमता गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात असल्याचा आपल्यास विश्वास आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले. मलपे - कर्नाटक येथील मासेमारी ट्रॅालर गोव्याच्या सागरी हद्दीत येऊन बुल ट्रॅालींग पद्धतीने अंदाधुंद मासेमारी करत आहेत. या पद्धतीच्या मासेमारीमुळे मत्स्यसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मलपे येथील या मच्छीमारांवर कारवाई होण्याची गरज आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या