इंधन दरवाढीची केंद्राकडून दिवाळी भेट; काँग्रेसची सरकारवर टीका

इंथन दरवाढीविरोधात (Fuel price hike), गोवा काँग्रेस (Goa Congress) करणार म्हापशात 3 नोव्हेंबरला ‘महागाईसुरा’चे दहन
Congress
Congress Dainik Gomantak

Goa: पेट्रोल व डिसेझ तसेच गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असून केंद्रातील भाजप सरकारने (BJP Govt) सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दिपावलीच्या (Diwali) ऐन तोंडावर पुन्हा एकदा इंधनाचा भडका उडवून भाजप सरकारने लोकांना दिवाळी भेट दिली आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी करून यापूर्वीच दरवाढीने शतक ठोकले आहे. दरवाढीच्या निषेधार्थ दिपावलीच्या पूर्वसंध्येला 3 नोव्हेंबरला म्हापशात (Mapusa) निदर्शने करून ‘महागाईसुरा’चे (Inflation) दहन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

Congress
अरविंद केजरीवाल यांचा गोव्यात तिसरा दौरा

पणजीतील यावेळी पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा उपस्थित होते. पुढे बोलताना चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकारने कोणाच्या ध्यानीमनी नसताना दिवाळीच्या या उत्सावावेळी इंधनात दरवाढ करून त्यावर विरजण घातले आहे. पेट्रोल व डिसेल दरवाढीबरोबरच व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २६४ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट्समधील पदार्थांचे दर भरमसाट वाढणार आहे. त्याचा फटका जनतेला बसणार आहे. हे सरकार वाट्टेल तशी दरवाढ करून जनतेची सतावणूक करण्यास सरसावले आहे. ही दरवाढ करण्यामागे सरकारकडून कोणतेच स्पष्टीकरण दिले जात नाही. ही दरवाढ सरकारने केलेल्या व्यावसायिक करामुळे होत आहे, असे चिदंबरम म्हणाले.

Congress
भ्रष्टाचार आरोपातील तथ्यामुळे भाजप गप्प

केंद्र सरकारकडून पेट्रोलवर व्यावसायिक कर ३३ टक्के तर डिझेलवर व्यावसायिक कर ३२ टक्के आकारला जात आहे. ही टक्केवारी कॉर्पोरेट करापेक्षा खूप आहे. प्रगतीशील कराऐवजी प्रतिगामी कर लादला जात आहे. या वाढलेल्या दरवाढीमुळे जनता आहारातील काही वस्तूंवरील खर्च कमी करू लागले आहेत. दूध, फळे व औषधांवर लोक खर्च कमी करू लागले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे नेहमीच्या खर्चावरही नियंत्रण आले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मजबूत बनले असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला त्यावर उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, देशभरात काँग्रेस भाजप मोदी सरकारविरुद्ध लढा देत आहे. तृणमूल काँग्रेसचा हेतू काय आहे हे मला माहीत नाही मात्र राज्यात जर सरकार बदल करायचे असल्यास ते काँग्रेसच करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com