गोवा: मोरजी किनाऱ्यावर आलिशान कार चालवणारा गजाआड

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

समुद्र किनारी चालवून इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी कारचा मालक अशोक वाडिया (Ashok Wadia) यालाही अटक केली.

पणजी: उत्तर गोव्यातील मोरजी येथील समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कार चालवल्या प्रकरणी दिल्लीतील एका व्यक्तीस पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. त्या व्यक्तीची कारणही पोलिसांनी जप्त केली आहे. (Goa Gajaad driving a luxury car on the shores of Morji)

Goa Lockdown: सांगे बाजारपेठ आजपासून बंद

पेडण्याचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील समुद्रकिनाऱ्यावर दिल्लीतील एक व्यक्ती आलिशान कार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाहणी केली असता डीएल ३सी, बीडी 5181 या क्रमांकाची कार समुद्रकिनाऱ्यावर चालविली गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानी तपास करून ती कार ताब्यात घेतली आणि कार समुद्र किनारी चालवून इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी कारचा मालक अशोक वाडिया (Ashok Wadia) यालाही अटक केली.

संबंधित बातम्या