Goa: तीस दिवसांच्या आत शेतकऱ्याना जमिनीच्या सनदा द्या, अन्यथा...

गाकुवेध फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सरकारला इशारा
Goa: तीस दिवसांच्या आत शेतकऱ्याना जमिनीच्या सनदा द्या, अन्यथा...
गाकुवेधच्या बैठकीत कुमेरी शेतीच्या दावेदाराना मार्गदर्शन करताना शंकर गावकर व बाजुला अन्य पदाधिकारी (Goa)Dainik Gomantak

तीस दिवसाच्या आत गावडोंगरी - खोला भागातील कुमेरी शेतकऱ्याना जमिनीच्या सनदा न दिल्यास पुढील कृतीचा इशारा गाकुवेध फेडरेशनच्या (Gakuvedh Federation) पदाधिकाऱ्यांनी आज सरकारला दिला. आज फेडरेशनने गावडोंगरी (Gavdongari) येथे पंचायत कार्यालया समोरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात शेतकऱ्याची बैठक (Farmers Meeting) घेतली. अर्धा दिवस चाललेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारने 2004 मध्ये स्पेशल ऑफीसर टीमची नेमणूक करून या 1964 मध्ये सरकारने येथील शेतकऱ्याना दिलेल्या कुमेरी जमिनीची पहाणी करून या कुमेरी जमिनीवरील शेतकऱ्याचा मालकी हक्क रास्त असल्याचा अहवाल दिला आहे.

गाकुवेधच्या बैठकीत कुमेरी शेतीच्या दावेदाराना मार्गदर्शन करताना शंकर गावकर व बाजुला अन्य पदाधिकारी (Goa)
Goa: राजकारणी केंद्रातून मिळणाऱ्या पैशावर ताव मारण्यात व्यस्त; गोवा सुरक्षा मंच

पुन्हा जानेवारी 2007 मध्ये पुन्हा या समितीने सबंधीत जमिनीची पहाणी करून शेतकऱ्यानी त्या जमिनीवर केलेल्या लागवडीची शहानिशा केली. ऑगस्ट 2009 मध्ये सरकारने नेमलेल्या बिगर सरकारी समितीने या जमिनीची सर्वे नोंदीची पहाणी करून सरकारला अहवाल सादर केला.त्यानंतर उपजिल्हाधिकारी, मामलेदार, क्षेत्रीय वनाधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने या जमिनी शेतकऱ्याना देण्यासाठी योग्य शुल्क निर्धारित करण्याची गरज व्यक्त करणारा अहवाल सरकारला सादर केला त्याचबरोबर या जमिनीवर त्यांची लागवड असून आता लागवडीतून त्याना उत्पादन मिळत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.गावडोंगरी व खोला पंचायत क्षेत्रात सर्व्हे क्रमांक 113/0, 42/0, 126/0, 6/0, 59/1, 26/0, 3/0, 402 व 274 या जमिनीत कुमेरी लागवड आहे. लागवड केलेल्या जमिनीत वनखाते हस्तक्षेप करू शकत नाही. कायद्याने शेतकऱ्याना संरक्षण दिले आहे त्या हत्याराचा उपयोग न्याय हक्क मिळविण्यासाठी करू असे आश्वासन फेडरेशनच्या वकील टीमने शेतकऱ्यांना दिले. यावेळी गावडोंगरी- खोला येथील कुमेरी लागवड जमिनिसाठी दावा सांगणाऱ्या शेतकऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. आज झालेल्या बैकीला फेडरेशनचे शंकर गावकर,अजय गावडे, दुर्गादास गावकर, संदेश गावकर,रामा काणकोणकर, रविंद्र वेळीप, रामकृष्ण जल्मी, वकील सुदेश गावकर, क्रांतिका गावकर, शिरोडकर, जॉन,पालकर त्याचप्रमाणे गावडोंगरीचे माजी सरपंच अशोक वेळीप, नारायण वेळीप उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com