Ganesh Chaturthi: ग्राहकांची बाप्पासाठी हात मोकळे करून खरेदी, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

चतुर्थीनिमित्त राज्यातील बाजारपेठा फुलल्या
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiDainik Gomantak

Ganesh Chaturthi गोमंतकीयांचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. या सणानिमित्त वाहने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह नानाविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठा फुलल्या आहेत.

चतुर्थीमुळे राजधानीचा अपवाद वगळता मडगाव, फोंडा, वास्को, डिचोली यासह राज्यातील इतर सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा महापूर ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे राज्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

राज्यात इतर सणांच्या तुलनेत चतुर्थीत खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठे आहे. आर्थिक उलाढालही कोट्यवधी रुपयांची होते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. गणेश चतुर्थीत दुचाकी-चारचाकी वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणात होते.

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात या गाड्या खरेदी केल्या जात असल्याचे प्रमुख विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशन, पंखे यासारख्या घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

पणजीतील माटोळीच्या बाजारात ग्राहक असले तरी फळे-फुले, हार-तुरे आणि इतर वस्तूंचे वाढलेले दर पाहता ग्राहक अत्यावश्यक वस्तूंचीच खरेदी करताना दिसतात. सजावटीचे साहित्य, विद्युत माळा, फटाके यांचीही बाजारात रेलचेल आहे.

Ganesh Chaturthi
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील इंधनाचे ताजे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे भाव

जागतिक बाजारातील उलाढालीमुळे सोन्या-चांदीचे दर जास्त आहेत. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या दागिन्यांची खरेदी कमी असली तरी बाजारात सकारात्मकता दिसत आहे. चतुर्थी निमित्ताने लोक कमी खरेदी करत आहेत; मात्र खरेदी सुरू आहे.

- विक्रम वेर्लेकर, व्यवस्थापक, उल्हास ज्वेलर्स.

महागाईमुळे बाजारात खरेदी-विक्री तुलनात्मक कमी आहे. पणजी मार्केटबाबत बोलायचे झाल्यास फेरी, प्रदर्शने यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय मिळत नाही. यंदाही चतुर्थीच्या निमित्ताने तीच स्थिती आहे. लोक कमी प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.

- राजेंद्र गावकर, विक्रेते.

गणेश चतुर्थीला बाजारपेठेत कोटींची उड्डाणे असतात. यंदा चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत लोकांची तुफान गर्दी असून आर्थिक उलाढालीचा आकडा आताच सांगता येणार नाही. हा आकडा कोट्यवधींचा असून सर्वांनी हात मोकळे करून खरेदी केली आहे. लहान विक्रेत्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचा उत्तम व्यवसाय सुरू आहे. यंदा सर्वांनाच बाप्पा पावला आहे.

- श्रीपाद सावंत, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना.

Ganesh Chaturthi
Goa Accident: गणेशोत्सवाच्या तोंडावर अपघातांचे सत्र, रविवारी चार अपघातात 15 जखमी, एक ठार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com