Goa Ganesh Fastival: माळ्यातलो झरीकार' संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
'माळ्यातलो झरीकार' संस्थेचा अनोखा उपक्रम Dainik Gomantak

Goa Ganesh Fastival: माळ्यातलो झरीकार' संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

एकीकडे लोक करोना परिस्थिती आणि महागाईचा फायदा उचलत भरमसाठ किंमतीत गणेश मूर्ती विकत असतानाच, 'माळ्यातलो झरीकार' या संस्थेने आपल्यापुढे एक आदर्श ठेवला आहे.

'माळ्यातलो झरीकार' संस्थेने सामाजिक बांधिलकी (social commitment) जपत आज पर्यंत अनेक गरजू लोकांना (helping hand to many people) मदतीचा हात पुढे केला आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना या संस्थे मार्फत मदत केली जाते. करोनाच्या परिस्थितीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बऱ्याच लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. महागाई आणि आर्थिक समस्यांच्या (financial crisis) विळख्यात अडकलेल्या या लोकांनासुद्धा गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करता यावी या करीता 'माळ्यातलो झरीकार' ही संस्था कमी किंमतीत गणेशमूर्ती उपलब्ध करून देत आहे.

'माळ्यातलो झरीकार' संस्थेचा अनोखा उपक्रम
Goa: वास्कोत शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात साजरा
'माळ्यातलो झरीकार' संस्थेतील गणेश मूर्ती
'माळ्यातलो झरीकार' संस्थेतील गणेश मूर्ती Dainik Gomantak

एकीकडे लोक करोना परिस्थिती आणि महागाईचा फायदा उचलत भरमसाठ किंमतीत गणेश मूर्ती विकत असतानाच, 'माळ्यातलो झरीकार' या संस्थेने आपल्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. यामध्ये त्यांनी करगिरांचा देखील विचार केला असून, त्यांच्या बनवलेल्या मूर्ती तश्याच राहू नयेत यासाठी देखील ही संस्था प्रयत्नशील आहे. मागील वर्षीही या संस्थेने हा उपक्रम राबवला होता, दरम्यान नागरिकांचा प्रचंड प्रतिसद मिळाल्याने या संस्थेने याही वर्षी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या संस्थे मार्फत देण्यात येणाऱ्या मुर्ती या पूर्णपणे शाडू पासून बनवण्यात आल्या असून त्या पर्यावरण पूरक आहेत.

'माळ्यातलो झरीकार' संस्थेचा अनोखा उपक्रम
Ganesh Chaturthi in Goa: कोरोना SOPs अद्याप नाही
'माळ्यातलो झरीकार' संस्थेतील गणेश मूर्ती
'माळ्यातलो झरीकार' संस्थेतील गणेश मूर्ती Dainik Gomantak

साधारण 2 फुट उंचीच्या या मूर्ती असून त्याची किंमत 900 रुपये इतकी आहे. याच मूर्तीची बाहेर किंमत साधारण 3 हजारा पर्यंत विकली जाते. देवाची मूर्ती मोफत दिली जात नाही म्हणून त्यांनी कमीतकमी किंमत ही मूर्ती उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमातील सर्व मूर्ती 2 फुटांच्या असून समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना याचा लाभ घेत येईल. माळा येथील हेडगेवार विद्यालयाच्या आवारात या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

इतर उपक्रम:

2019 मध्ये या संस्थे मार्फत पणजी बस स्थानक नजीक एक दालन सुरू केले होते, या दलना मार्फत गरजू लोकांना कपडे व इतर वस्तु दिल्या जात होत्या. समाजातील दानशूर व्यक्तींनी समाज भावनेतून आमच्या उपक्रमाला वस्तु दान करतात त्या आम्ही या दालना मार्फत गरजू लोकान पर्यंत पोहोचवतो अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश अमोणकर यांनी दिली

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com