Goa Ganesh Festival: म्हापशात विसर्जनासाठी 'कृत्रिम तलाव'

नगराध्यक्ष वायंगणकर: आमदार, पालिका मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून होणार उपक्रम
Goa Ganesh Festival: म्हापशात विसर्जनासाठी 'कृत्रिम तलाव'
Artificial lakeDainik Gomantak

म्हापसा: तार नदीचे प्रदूषण (pollution) झाल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना निर्मळ पाण्यात मूर्तिविसर्जन करणे शक्य व्हावे यासाठी लोकांच्या मागणीनुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही येत्या दोन दिवसांत म्हापसा (mapusa) येथील बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात कृत्रिम तलाव (artificial lake) उभारण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दिली. आमदार व पालिका मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम साकार होणार आहे व त्यासंदर्भात कोमुनिदादकडून ना हरकत दाखला घेण्यात आला आहे, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

Artificial lake
Goa SOP Impact: भटजींचा भाजपवर प्रभाव

अवघ्या तीन दिवसांवर गणेश चतुर्थी आली आहे. बाजारात उत्सवाची वातावरणनिर्मिती झाली असून, पोर्तुगीजकालीन महत्त्व असलेला बाणस्तारीचा बाजारही माटोळीच्या सामानांनी सजला आहे. राजधानी पणजीतही माटोळी व सजावटीच्या सामानाची गर्दी झाली आहे. गेल्या वर्षी कोविड संकटामुळे चतुर्थी साजरी करण्यावर मर्यादा आली होती. यंदा कोविड संकट नियंत्रणात असल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. लोकही बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. पणजी, म्हापसा, फोंडा, काणकोण, खांडोळा या ठिकाणी गर्दीचा फज्जा उडाला आहे. गेल्या वर्षी बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी केलेल्या सहकार्यानंतर म्हापसा रोटरी क्लब, म्हापसा नगरपालिका, म्हापसा रोटरॅक्ट क्लब आणि जेसीयाय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून म्हापसा शहरात सध्या गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव साकार झाला होता. त्या तलावात मोठ्या संख्येने श्रीमूर्तीचे विसर्जनही झाले होते. तार नदी अजूनही प्रदूषित असल्याने कृत्रिम तलाव यंदाही खोदण्यात यावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हापसा पालिकेसमोर सातत्याने केली होती.

Artificial lake
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर

गेल्या वर्षी म्हापशातील सुप्रसिद्ध श्रीबोडगेश्वर मंदिराच्या परिसरात असाच तलाव उभारण्यात आला आहे होता. पुणे-मुंबईत अशा स्वरूपाचे कृत्रित तलाव असले तरी गोव्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. गतवर्षीच्या तलावाची लांबी वीस मीटर, रुंदी सात मीटर तर खोली चार फूट होती. परंतु, यंदा तलावाचे आकारमान नेमके किती असेल हे अद्याप पालिकेने जाहीर केलेले नाही. म्हापसा पालिकेतर्फे यंदा गणेशविसर्जनासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार केले जाणार असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही पालिकेच्या वतीने केली जाईल. या तलावात पाणी साठावे यासाठी भूभागावर प्लास्टिकचे आवरण घालण्यात येईल. तसेच एखादी दुर्घटना घडू नये यासाठी सर्व बाजूंनी बॅरिकेट्‍स उभारण्यात येतील. भाविकांनी या ठिकाणी गणेशविसर्जन करण्यासंदर्भात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तलावाच्या ठिकाणी उपलब्ध असलेले स्वयंसेवक गणेशमूर्तींचे विसर्जन करणार आहेत. मूर्तींचे विसर्जन थोडेसे जिकिरीचे तसेच धोकादायक असल्याने अन्य लोकांना गणेशविसर्जन स्वत:हून करण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com