Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'

गोमंतकात साजऱ्या होणाऱ्या इतर अनेक सणांमध्ये "सणांचा राजा'' हे अभिधान कुठल्या सणाला द्यायचे ठरवले तर ते निःसंशयपणे गणेश चतुर्थीला द्यावे लागेल (Goa Ganesh Festival).
Goa Ganesh Festival: वैशिष्ट्यपूर्ण गोमंतकीय 'चवथ'
Goa Ganesh Festival: Characteristic Gomantakiya 'Chavath'

गोमंतकात साजऱ्या होणाऱ्या इतर अनेक सणांमध्ये "सणांचा राजा'' हे अभिधान कुठल्या सणाला द्यायचे ठरवले तर ते निःसंशयपणे गणेश चतुर्थीला द्यावे लागेल (Goa Ganesh Festival). पुण्यभूमी गोमंतकात गणेशभक्तीची परंपरा चंद्रगुप्त मौर्य राजवटीच्या काळापासून सुरू झाली. इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकातील जीर्ण झालेल्या, परंतु वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आजही गोव्यात पाहायला मिळतात (Ganesh Chaturthi 2021). बदामीच्या तालुक्‍यांनी आपल्या राजवटीत गणेशाला अग्रस्थान दिले होते. गोव्यात गणेशोत्सवाला "चवथ'' म्हणून संबोधले जाते. चवथीला सर्व कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करतात (). गेल्या दोन वर्षात कोविडचे सावट असूनही घरोघरी उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. घरोघरी गणेशाच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत.(Goa Ganesh Festival: Characteristic Gomantakiya 'Chavath')

Goa Ganesh Festival: Characteristic Gomantakiya 'Chavath'
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!

गोव्यावर राज्य करणाऱ्या चालुक्‍याची राजधानी रेडी होती. तेथे आजही तत्कालीन काळातील जांभ्या दगडात कोरलेली गणेशप्रतिमा आहे. त्यानंतर गोव्यावर राज्य केलेल्या शिलाहार, कदंब, विजयनगरच्या राजवटीतही श्रीगणेश पूजेला अग्रस्थान होते. त्यामुळेच आजही गोवेकरांचा मुख्य सण गणेश चतुर्थीच आहे. गोव्यातील चवथ भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीला सुरू होते, पण तिची समाप्ती एकाच दिवशी होत नाही. चवथीचा उत्सव मखरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून सुरू होतो आणि गावातल्या नदीत, तळ्यात, विहिरीत किंवा ओढ्यात त्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर संपतो. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्‍ल पंचमीला श्रीगणरायाचे विसर्जन केले जाते. याला ‘दीड दिवसांची चवथ'' म्हणतात. तर काही ठिकाणी पाचव्या, सातव्या, नवव्या किंवा अकराव्या दिवशी चवथीची समाप्ती होते. क्वचित ठिकाणी एकवीस दिवसही गणेश पूजन केले जाते. तर काही समाजात वर्षभरही गणेशमूर्ती ठेवली जाते.

गणेश मूर्तीची स्थापन केल्यानंतर पूजा केली केली जाते. यावेळी आरती म्हटली जाते. गोव्यात आरती हा प्रकारही वैशिष्ट्यपूर्ण आहे. झांज, घुमट वाजवून आरती म्हटली जाते. साग्रसंगीत आरतीसाठी समेळ, घुमट, कासाळे घेऊन किंवा पेटी, पखवाज, झांज घेऊन आरती म्हटली जाते. ग्रामपातळीवर आरती म्हणणारा मोठा गट निर्माण होतो आणि अनेक आरती गणेशपूजेला म्हटल्या जातात.

Goa Ganesh Festival: Characteristic Gomantakiya 'Chavath'
Ganesh Utsav 2021: जाणून घ्या पुजा मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख

गोमंतकीय "माटोळी"

गणेशमूर्तीला मखरात बसविण्याआधी माटोळी बांधली जाते. "माटोळी'' हा प्रकार फक्त गोवा आणि तळकोकणात आढळतो. कोकणात त्याला माटवी असेही म्हणतात. ही माटोळी मखराच्या पुढे छताला टांगून बांधली जाते. बांबूच्या काठ्यापासून सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराचा सांगाडा आधी तयार केला जातो. तो छताला बांधला की या माटोळीला सर्वप्रथम मध्यभागी बांधली जाते, ती पाच, सात किंवा नऊ नारळांची पेंड. ती न मिळाल्यास मोठ्या आकाराचा न सोललेला नारळही बांधला जातो. त्यानंतर माटोळीच्या चारही कडांना आम्रपर्णांच्या डहाळ्या बांधल्या जातात. जंगलात किंवा डोंगरावर सापडणारी कांगलां, कुंडळा, कुडे, घागऱ्या, पोफळीचा कातरा अशा अनेक वस्तू माटोळीला टांगल्या जातात. त्या बांधण्यासाठी दोरी किंवा सुंभ वापरला जात नाही. त्याऐवजी केवणीचे दोर वापरले जातात. दुधी भोपळा, घोसाळी, तवशी, केळ्यांचा घड, मक्‍याचे कणीस, फेरू, सफरचंद, डाळिंब यासारखी निसर्गाची देणही माटोळीला बांधले जाते. आकर्षक माटोळीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार व स्थानिक संस्था, क्‍लबतर्फे स्पर्धाही घेतली जाते.

गोमंतकीय "माटोळी"
गोमंतकीय "माटोळी"Twitter

चवथीचे "ओझे''

देशातील इतर प्रांतात नवीनच लग्न झालेल्या मुलीला माहेरून काही वस्तू देण्याची पद्धत आहे. परंतु गोव्यात "ओझे'' (वजे) पद्धत वेगळी आहे. अशी पद्धत देशावर दिसत नाही. गोव्यात मुलाच्या घरून जावयाच्या घरी वजे पाठवण्याचा रिवाज आहे. या वज्यात करंज्या, लाडू व इतर फराळ, फळफळावळ इत्यादीसोबत माटोळीला लागणारे लाकडी सामानही पाठवले जाते. ही लाकडी फळफळावळ बहुधा सावंतवाडीवरून आणली जाते. वस्तूंसोबत या लाकडी वस्तूही माटोळीला बांधण्यात येतात. रूढी, परंपरा पिढ्यान्‌पिढ्या चालत आल्या आहेत. त्यापैकी ‘ओझे’ ही पद्धती, रिवाज असून मायेचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ‘ओझे’ पद्धत रूढ झाली असावी.

कृषी पंचमी

चवथीचा दुसरा दिवस पंचमी. हा "नव्याची पूजा'' करण्याचा दिवस. "नव्याची'' म्हणजे शेतातील नव्या कणसांची पूजा. यासाठी शेतावर जाऊन कणसाच्या लोंब्या आणतात. त्या आंब्याच्या पानात गुंडाळून एका पाटावर ठेवतात व त्यांची गंधफूल वाहून पूजा करतात. त्याला ऋषी पंचमी असेही म्हणतात.

Goa Ganesh Festival: Characteristic Gomantakiya 'Chavath'
Ganesh Chaturthi 2021: गणपतीला "दूर्वा" का वाहता?

खाद्यसंस्कृती

गणेशोत्सवात मोदकाबरोबर गोव्यात नेवऱ्या (करंज्या) असतात. गोमंतकीय महिलांनी बनविलेल्या करंज्या वेगळ्याच असतात. त्यांना गोमंतकीय वेगळी "चव'' असते. त्यातही ओल्या पुरणाच्या, किसलेल्या नारळापासून केलेल्या पंचखाद्याच्या, रव्याच्या पिठाच्या, तिखट पिठीच्या अशा प्रकारांचा समावेश आहे. नेवऱ्यांप्रमाणेच पुरणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. मूगाचे लाडू, चून घातलेली मुठली, पातोळ्या, गोड पोहे, गुळाच्या पाकातले पीठ आवळे असे प्रकारही नैवेद्यात वापरले जातात. दुपारच्या जेवणात गोड पदार्थांची अक्षरशः रेलचेल असते. खीर, मणगणे, सोजी आणि गोडशे हे गोमंतकीय पदार्थ. सोबत तळलेल्या पुऱ्या, वडे, भाज्यांमध्ये घोसाळ्याची भाजी, भेंडीची भाजी, केळीची किंवा सुरणाची भाजी, कोबीची भाजी, शेवग्याच्या किंवा दुधयाच्या फुलाची भाजी, निरफणसाची भाजी असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com