Goa:चतुर्थीतील कोटींची उलाढाल ठप्प...

पेडणे गोवा येथे डझनभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उपक्रमांना ‘ब्रेक’
Goa Ganesh Utav
Goa Ganesh Utav Dainik Gomantak

मोरजी : पेडणे (Goa) तालुक्यात एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून (Ganesh Utsav) दरवर्षी गणेश चतुर्थीत या सर्व मंडळांची मिळून एक कोटीच्या आसपास उलाढाल होत होती. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) याला ब्रेक लागला आहे. या निधीतून सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धात्मक कार्यक्रम, शिष्यवृत्ती, मदतकार्य, सामाजिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर दिला जात होता, त्यातही खंड पडला आहे. कोरगाव येथील सर्वाधिक ५५ वर्षांचे जुने मंडळ तर अलीकडचे चार वर्षांपूर्वीचे कासारवर्णे मंडळ कार्यरत आहे. यातील मोरजी आणि हरमल मंडळांनी स्वतःचे सभागृह उभारले आहे. मोरजी, मांद्रे व हरमल येथील गणेशोत्सव मंडळांना मोठ्या संख्येने आश्रय दाते देणग्या देऊन अनेक कार्यक्रम पुरस्कृत करतात. पेडणे पालिका क्षेत्रात एकूण तीन मंडळे आहेत. पेडणे सार्वजनिक गणेशोत्सव, पेडणे पोलीस स्टेशन आणि लोकमान्य पेडणे. लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध कार्यक्रम, स्पर्धात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. पेडणे पोलीस स्टेशनवर कार्यक्रम नसले तरी सृजनशील देखावा सादर केला जातो. पोलिस (Goa Police) कर्मचाऱ्यां चतुर्थीला घरी जाता येत नाही. त्यामुळे याच ठिकाणी पोलिसांनी एकत्रित येऊन उत्सव सुरू केला आहे. (Goa)

Goa Ganesh Utav
Goa: पणजी मनपा व दुकानदार यांच्यातील संघर्ष पेटणार

पेडणे तालुक्यातील पोलिस स्टेशन (Pernem) अपवाद (Police Station) वगळता इतर ११ सार्वजनिक मंडळे वार्षिक जमा-खर्च हिशेब जाहीरपणे सादर करतात. सार्वजनिक मंडळे उत्सव निधी उभारण्यासाठी आणि गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी देणगी कुपन काढतात. मात्र, यंदा मोजकीच मंडळे देणगी कुपन काढणार आहेत. मोरजी आणि हरमल या दोन मंडळांकडे स्वत:ची सुसज्ज सभागृहे आहेत. तेथे गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. इतर वेळी लग्न सभारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह भाडेपट्टीवर उपलब्ध केले जाते. त्यातूनही निधी उपलब्ध केला जातो. पालये, मांद्रे, पार्से, पेडणे ही मंडळे नजिकच्या मंदिरांत मूर्ती पूजतात. धारगळ पंचायत सभागृह, पेडणे पोलीस स्टेशन इमारत, आगरवाडा व पेडणे लोकमान्य येथे खास मंडप उभारून उत्सव साजरा करतात. या सर्व मंडळांचे खास वैशिष्ट्य म्हणजे निदान एका तरी दशावतार नाटकाचे आयोजन केले जाते. (Goa Ganesh Utsav) मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्वत: नाटकाची निर्मिती करून वेळप्रसंगी स्पर्धेच्या नाटकातही सहभागी होतात. राज्यात विविध ठिकाणी प्रयोग सादर केले जातात. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे मंडळ कार्यरत आहेत.

Goa Ganesh Utav
Goa: केरी सत्तरीत टँकरने ठोकरल्याने इसमाचा मृत्यू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com