Goa: गणपतीच्या मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध

पर्यावरणपूरक मुर्त्या हलक्या व अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध (Goa)
Eco Friendly Ganapati Idols (Goa)
Eco Friendly Ganapati Idols (Goa)Nitin Korgaokar / Dainik Gomantak

पणजी: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा सण संपूर्ण कोकणातील (Konkan) घरोघरी उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणार सर्वात महत्वाचा सण आहे. नोकरी, व्यवसायानिमित बाहेर गावी असलेले लोक चतुर्थी सणाला (Chaturthi Festival) आवर्जून आपापल्या गावी येतात. कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) गेली दोन वर्षे मात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे कठीण होऊन बसले आहे, त्यामुळे उत्साहावर थोडे फार पाणी पडले असले तरी चतुर्थीचे वेध, गावागावातील चित्रशाळेत गणेशमूर्ती (Ganesh Idols) साकारु लागल्या आहेत. काही ठिकाणी शाडू मातीच्या (Shadu Soil) पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध देखील झाल्या आहेत (Ganesh Idols available for Sale in Goa).

गणेश चित्रशाळेतून मूर्तिकार मूर्ती साकारण्यात दंग आहेत

शिवोली येथील ज्येष्ठ मूर्तिकार पांडुरंग केशव आगरवाडेकर व त्यांच्या कन्या अक्षया आगरवाडेकर या वडिलोपार्जित गणपती मूर्तिकलेचा व्यवसाय निष्ठेने चालवत आहेत. पांडुरंग हे वडिलांच्या मांडीवर बसून ही कला लहान असतांनाच शिकले. दरवर्षी त्यांच्या चित्रशाळेतशंभरहून अधिक गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात. वडील वारल्यानंतर काका व ते मिळून मूर्ती बनवू लागले. कालांतराने काका वारले व पांडुरंग यांना एकट्याला हा व्यवसाय झेपेना म्हणून त्यांनी काही काळ मूर्ती बनवणे थांबवले. दरम्यान त्यांची मुलगी अक्षया गोवा कला महाविद्यालयातून उपयोजित कलेतील फाईन आर्टची पदवी घेऊन बाहेर पडली. एलस्स्ट्रेशन हा तिचा मुख्य विषय होता. मग तिने वडिलांना गणेश मूर्ती बनविण्याचा खंडित झालेला व्यवसाय दोघांनी मिळून सुरू करूया असे सांगून सुरवात केली. आता ती फाईन आर्ट मधील पदव्युत्तर पदवी (एमएफए) अभ्यासक्रम पूर्ण करत आहे तरी वडिलांनासोबत मूर्ती बनविण्यात ती मग्न आहे. विविध आकारातील मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत.

एव्हाना शाडू मातीच्या वैविद्यपूर्ण गणेशमूर्ती विक्रीस येऊन थडकल्याहीआहेत. कोकणातील सासोली गावातील एका कलाकाराच्या अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक मूर्ती करासवाडा-म्हापसा येथे थिवीकडे जाणाऱ्या मार्गावर लक्षवेधून घेत आहेत. दीड हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत मूर्ती तिथे विक्रीस उपलब्ध आहेत. पणजी येथेही पर्यावरणपूरक मूर्ती झरीकडील मगनलाल सदन इमारतीतील स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. सत्तरी तालुक्यातील पर्ये गावातील कलाकार, पर्यावरणीय पुरस्कार प्राप्त सूर्यकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या जातात. त्या हलक्या व अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. ७०० रुपयांपासून या मुर्त्यांची विक्री केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com