Goa: घरोघरी गॅस जोडणीस गोवेकर निरुत्साहीच

Goa: तीन महिने गॅस मोफत देण्याची घोषणा करूनही गोव्यातील लोक घरोघरी गॅस घेण्यास पुढे येत नाहीत
Goa: घरोघरी गॅस जोडणीस गोवेकर निरुत्साहीच
Goa: Gas Pipeline.Dainik Goamantak

पणजी : तीन महिने गॅस मोफत देण्याची घोषणा करूनही गोव्यातील (Gas Pipeline In Goa) लोक घरोघरी गॅस घेण्यास पुढे येत नाहीत, अशी माहिती गोवा नॅचरल गॅस प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहंमद जफर खान यांनी दिली.

गोव्यात घरोघरी गॅस पुरवठा योजना सुरू झाली आहे. केंद्र सरकारने गोवा सरकारच्या मान्यतेनंतर जेल गॅस व गोवा नॅचरल गॅस यांना घरोघरी गॅस पुरवठा करण्याची संधी दिली आहे. मात्र, गोव्यातील लोक त्याबाबत बरेच निरुत्साही दिसून येत आहेत. पणजी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहंमद जफर खान यांनी सांगितले, की आपल्या कंपनीचे देशभर ८ लाख २० हजार ग्राहक आहेत. गोव्यातील ग्राहकांसाठी पहिले तीन महिने मोफत गॅस उपलब्ध करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानंतर ८ हजार लोकांनी नोंदणी केली. मात्र. आतापर्यंत अवघ्या ७०० लोकांनीच गॅस कनेक्शन सुरू केले आहे. दररोजच्या गॅसपेक्षा हा गॅस ३० टक्के स्वस्त पडतो. तसेच यदा कदाचित आग लागली तरी स्‍फोट होत नाही, असे सांगून राज्यात वर्षभरात १५०० कनेक्शन्‍स देण्याचे आपले लक्ष्‍य असल्याचे खान यांनी सांगितले.

Goa: Gas Pipeline.
गोव्यात पुन्हा भाजपाचेच सरकार ; केंद्रीय नेत्या सुखप्रीत कौर

५०० रुपये भरून मोफत कनेक्शन दिले जाते. तसेच पहिले तीन महिने मोफत गॅस पुरवला जातो. गोवा नॅचरल गॅसच्या वेबसाईटवर नोंदणी करता येते. पणजी व फोंडा परिसरातील काही सोसायट्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मोहंमद जफर, निलय वकील व म्रिंदल पांडे उपस्थित होते.

Goa: Gas Pipeline.
Goa:आग्वाद किल्ला ‘दृष्टी’च्या घशात

Related Stories

No stories found.