Goa Fest : पुरुमेंताच्या फेस्ताकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

राजधानीत अत्यंत कमी प्रतिसाद : मोजकेच विक्रेते; दुसऱ्या दिवशीही निराशा
Goa Fest
Goa FestGomantak Digital Team

पणजी : राजधानीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरील रस्त्यावर पुरुमेताचे फेस्त भरले आहे. पावसाळ्यात स्वयंपाक गृहात लागणाऱ्या विविध वस्तूंची साठवण तथा बेगमी करण्याची आजही परंपरा कायम आहे. काही मोजकेच वस्तू विक्रेते दाखल झाले असून, रविवार असतानाही फेस्तला अल्प प्रतिसाद मिळाला.

पणजीतील पुरुमेताचे फेस्त ही एक मागील वीस वर्षांपूर्वीची वेगळी ओळख होती. परंतु कालानरुप सर्व वस्तू आता ग्राहकांना सहजपणे कोणत्याही बाजारात उपलब्ध होत असल्याने पुरुमेताच्या फेस्तसाठी स्थानिक विक्रेते मोठ्या संख्येने येणे टाळतात. स्थानिक आणि जवळच्या शहरातील बाजारात अशा वस्तू विक्रीस घेऊन जाणे अनेकांना परवडते. राजधानीत भरलेल्या फेस्तमध्ये अळसाणे, नारळ, कोकम, तांदूळ अशा वस्तूंपासून अगदी झाडूपर्यंत वस्तू विक्रीस होत्या. परंतु, या वस्तू खरेदी करण्यासाठी अगदी तुरळक ग्राहक बाहेर पडल्याचे दिसून आले.

Goa Fest
Sameer Wankhede Controversy : समीर वानखेडेंना आज अटक होणार...कोर्टाने दिलेलं अटकेपासुनचं संरक्षण आज समाप्त

उन्हाचा मोठा फटका

पणजीतील अनेक नागरीक उन्हाळ्यामुळे गावी परतले आहेत. तसेच वाढत्या उष्म्याच्या त्रासामुळेही लोक घराबाहेर पडले नाहीत. त्याशिवाय गावाकडून आता सहजपणे ये-जा करणेही शक्य झाल्याने जेथून बेगमीच्या वस्तू उपलब्ध होतात, त्या नागरिक घेऊन येतात. खास फेस्तमध्ये खरेदीसाठी येण्याचा प्रकार मोडीत निघाला आहे. ‘आलोच आहे, तर घेऊया एखादी वस्तू’ असा विचार करूनच काहीजण खरेदी करतात.

Goa Fest
कारमध्ये होते एक वर्षाचे बाळ अन् ड्रायव्हरची झोप लागली; सांकवाळ येथे दोन कारचा अपघात, 3 जखमी

दरवर्षी पुरुमेताचे फेस्त भरते. लोक विशेषत: गोव्यातील लोक या फेरीला भेट देतात आणि पावसाळ्याच्या दिवसात साठवून ठेवता येण्याजोग्या आणि वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. "मी कोळंबी, सुके बांगडे, तारले अशी सुके माशे विकते.

नमीषा फातर्पेकर, बेती (सुकी मासळीविक्रेती)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com