बांधकाम कामगार मंडळ आणि कामगार विभागाचे लेखापरीक्षण व्हावे; गोवा फॉरवर्डची ‘कॅग’कडे मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सरदेसाई म्हणाले की, राज्य सरकारने कामगारांवर अन्याय केला आहे. त्यांनी लेबर गेटच्या माध्यमातून कामगारांना लूटले. तसेच या कामगारांचे हक्काचे पैसे सरकारने पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी खर्च केले.

पणजी: बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार मंडळ आणि कामगार विभागाचे लेखापरीक्षण व्हावे. यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने आज कॅगच्या महालेखाकारांची भेट घेतली. 

यानंतर बोलताना सरदेसाई म्हणाले की, राज्य सरकारने कामगारांवर अन्याय केला आहे. त्यांनी लेबर गेटच्या माध्यमातून कामगारांना लूटले. तसेच या कामगारांचे हक्काचे पैसे सरकारने पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी खर्च केले. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने नियंत्रक आणि महालेखापरीक्षण विभागाच्या महालेखाकारांची भेट घेऊन याबाबत लेखापरीक्षण व्हावे यासाठी निवेदन दिले.   

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या