गोव्याचा ‘स्पाईस जीनी’ आयर्लंडमध्ये विजेता

गोमंतकीय आणि भारतीय (India) पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ त्याच्या फुड ट्रकवर उपलब्ध असतात.
Goa| Indian Food
Goa| Indian FoodDainik Gomantajk

गोव्यातल्या हळदोणा गावांमधून आयर्लंडमधल्या कॉर्क या नगरात पोहोचलेला ख्रिस्तोफर ब्रागांझा तिथे ‘स्पाईस जीनी’ म्हणून ओळखला जातो. कॉर्क येथे ख्रिस्तोफरचा ‘स्पाईस जीनी’ हा फुड ट्रक (Food Truck) आहे. गोमंतकीय आणि भारतीय (India) पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ त्याच्या फुड ट्रकवर उपलब्ध असतात. घरगुती पद्धतीने बनवलेले हे अस्सल भारतीय खाद्यपदार्थ तिथल्या मिडलटोन मार्केट तसेच अन्य ठिकाणी तो गरमागरम पुरवतो. आयर्लण्डमधल्या एका प्रतिष्ठित टीव्ही वाहिनीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचा तो हल्लीच विजेता बनला आहे. या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत ख्रिस्तोफरने इतर पाच स्पर्धकांवर अंतिम फेरीत विजय मिळवला. या विजेतेपदामुळे ख्रिस्तोफर त्याच्या विशेष भारतीय पाककृतींसाठी आता राष्ट्रीय स्तरावर ओळखला जाईल. ‘कॉर्क ब्युओ’ हे तिथले पत्र म्हणते, ‘त्याच्या या विजेतेपदामुळे, तो ज्या भागात वास्तव्यास आहे ते मिडलटोन क्षेत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करते आहे.’

ख्रिस्तोफर आणि अन्य स्पर्धकांना सहा एपिसोडच्या या मालिकेत विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. काही आव्हानांमध्ये तर त्यांना प्रतिस्पर्ध्यांची विशेष डिश तयार करायची होती. एका बॉक्समध्ये असलेल्या कच्च्या रसदीमधून चवदार पाकपदार्थ बनवणे तसेच ‘ब्लाईंड टेस्ट’ अशी अन्य आव्हानेही या स्पर्धेत होती. आयर्लण्डचे प्रख्यात शेफ, एरिक मॅथ्यू आणि ग्रेन मुलिन्स हे या स्पर्धेचे परीक्षण करत होते. एरिक यांना जगभरच्या तारांकित रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा 17 वर्षांचा अनुभव आहे. डब्लिन इथल्या प्रसिध्द ‘चॅप्टर वन’ मध्ये मुख्य शेफ म्हणून त्यांनी काम केले आहे. ग्रेन मुलीन्स हे ‘ग्रा चॉकलेट’ चे पुरस्कार विजेते पेस्‍ट्री शेफ होते.

Goa| Indian Food
झुआरी अपघातामागे हलगर्जीपणा की बेसावधपणा?

आपल्या विजेतेपदाबद्दल बोलताना ख्रिस्तोफर म्हणाला, ‘हे विजेतेपद माझ्यासाठी खास आहे. या विजेतेपदाचे श्रेय मी माझा गोवा (Goa), तिथले माझे कुटुंब, माझा देश, कॉर्क, माझे पुरवठादार आणि ग्राहक यांना देतो. यातला प्रत्येक घटक माझ्या प्रवासाचा महत्वाचा भाग आहे’. जीवनात बरेच चढ-उतार अनुभवणाऱ्या ख्रिस्तोफरसाठी हे विजेतेपद गौरवास्पद आहे. या स्पर्धेचा उपविजेता बनलेल्या स्कॉट यानेही ख्रिस्तोफरचे तोंडभरून कौतुक केले.

‘बॅटल ऑफ फुड ट्रक’ या मालिकेचा होस्ट, जेम्स पेट्रीस या मालिकेबद्दल सांगताना म्हणाला ‘ही मालिका थरारक ठरली. स्पर्धेत उतरलेले सारेच स्पर्धक देशातले उत्कृष्ट शेफ होते. त्यांची प्रतिभा, उत्कटता आणि कौशल्य हे पराकोटीचे होते. अर्थात त्यांच्या तीव्र वेडेपणालाही श्रेय द्यायला हवे.’ या स्पर्धेचे वर्णन करताना पेट्रीस पुढे म्हणाला, या स्पर्धेची अंतिम फेरी ही तोडीस तोड अशी टक्करच होती. ख्रिस्तोफरचे कौतुक करताना तो म्हणाला, त्याच्या अप्रतिम खाद्यपदार्थांची मेजवानी, हा या स्पर्धेचा पूर्णानंद देणारा अनुभव होता. त्याच्या अविश्वसनीय ‘स्पाईस जीनी फुड’चे कौतुक करावे तितके थोडे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com