Goa: 'चवथी' निमित्त डिचोलीत फुलांना 'अच्छे दिन'

फुलांना (Flower) आलीय तेजी, दरही कडाडले, 'कोविड' (Covid-19) महामारीनंतर मागील महिन्यात श्रावण मासारंभाला सुरवात होताच फुलांना मागणी वाढली आहे.
Goa: 'चवथी' निमित्त डिचोलीत फुलांना 'अच्छे दिन'
गणपती बाप्पाच्या नावाने फुलांना मागणी असल्याने फूल बाजारातील वातावरणही खुलून उठले असून, फुलांना 'अच्छे दिन' आले आहेत.Dainik Gomantak

डिचोली: चतुर्थीनिमित्त डिचोलीत फुलांचा बाजार (Flower market) फुलला असून, डिचोलीत (Bicholim) फुलांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून डिचोली बाजारात फुलांना प्रचंड मागणी असून, पुढील किमान दोन ते तीन दिवस फुलांना मागणी कायम राहणार आहे. गणपती बाप्पाच्या घरोघरी आगमनानंतर काल एकाच दिवशी बाजारात जवळपास दोन टनाहून अधिक फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. फुले खरेदीला प्रचंड जोर आला होता. गणपती बाप्पाच्या नावाने फुलांना मागणी असल्याने फूल बाजारातील वातावरणही खुलून उठले असून, फुलांना 'अच्छे दिन' आले आहेत.

 गणपती बाप्पाच्या नावाने फुलांना मागणी असल्याने फूल बाजारातील वातावरणही खुलून उठले असून, फुलांना 'अच्छे दिन' आले आहेत.
Bicholim: प्रथमच होणार 'कृत्रिम तळ्या'मध्ये गणपती 'बाप्पा'चे विसर्जन

'कोविड' महामारीनंतर मागील महिन्यात श्रावण मासारंभाला सुरवात होताच फुलांना मागणी वाढली आहे. आता त्यात वाढ झाल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले आहे.

फ़ुलांचे दर कडाडले

डिचोलीत कर्नाटक राज्यातून झेंडू, शेवंती, लहान गुलाब या ठराविक फुलांची आवक होत असे. आता त्यात 'डिस्को शेवंती' ची भर पडली आहे. स्थानिक जाईची फुलेही बाजारात उपलब्ध होत आहेत. या फुलांना सध्या मागणी आहे. मागणी वाढल्याने फुलांचे दरही कडाडले आहेत. सध्या झेंडू फ़ुलांचे दर 160 रूपये किलो असे आहेत. तर सफेद शेवती, लांब देठाची आणि डिस्को शेवती आणि लहान गुलाब 400 रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. फुलांच्या हारांनाही प्रचंड मागणी आहे. आकाराप्रमाणे 50 रुपयांपासून पुष्पहार विकण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com