Sonali Phogat case : सावंत सरकारने पुरावे नष्ट केले, सरदेसाईंचे आरोप

Sonali Phogat case : प्रमोद सावंतांवर गंभीर आरोप; सरदेसाई म्हणतात...
vijay sardesai
vijay sardesaiDainik Gomntak

गेले काही दिवस भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाची देशभर चर्चा झाली. याच प्रकरणावर आज गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारला धारेवर धरत पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते दैनिक गोमंतक पणजी कार्यालयात मुलाखतीदरम्यान बोलत होते.

(Goa forword party leader Vijai Sardesai allegeas prmod sawant goverment)

vijay sardesai
Vijay Sardesai: विकासाच्या नावाखाली केलेले पक्षांतर हा राजकीय व्याभिचार; विजय सरदेसाई

हॉटेल नूतनीकरणातून राज्यसरकारने पुरावे नष्ट केले

सोनाली फोगाट यांच्याबाबतीत जे अखेरच्या काही तासात घडलं ''हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडीओ सुरुवातीला मिळाले नाहीत. आणि आता या हॉटेलचे तीन महिन्यात नूतनीकरण केले गेले'' तीन महिन्यात नूतनीकरणाची आवश्यकता नसताना प्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी हे नियोजन केले आहे'. आता सीबीआयच्या हवाली हे प्रकरण आहे. मात्र सीबीआयच्या हाताला काहीही लागणार नाही, याची खात्री देतो असे सरदेसाई म्हणाले.

vijay sardesai
Digambar Kamat : दिगंबरांचे कार्यकर्त्यांशी मनोमिलन; मात्र बैठकीबाहेर असताना 40 मिनिटांत काय झालं?

डॉक्टर मुख्यमंत्र्यांना जास्त गांभिर्याने घेऊ नका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत असे कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहेत, जे मृताचा अहवाल येण्यापूर्वी मृत्यू हृदयविकारामूळे झाला असं ठामपणे सांगू शकतात. अशा प्रकारचे हे मुख्यमंत्री डॉक्टर आहेत, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका हे गोव्यासाठी खुप घातक आहे. गोवा प्रशासनाचे पोलिस या मृत्यूला अनैसर्गिकरित्या मृत घोषित करतायेत. आणि मृत्यू हृदयविकाराने झाला असं मुख्यमंत्री सांगतायेत तर इथेच सारे समजते असे सरदेसाई म्हणाले.

सीबीआयने मुख्यमंत्र्यांचीच चौकशी करावी

'गोवा सरकारने सर्वच यंत्रणा ह्या आपल्या बाजूने कशा असतील याबाबत काळजी घेतली आहे. त्यामूळे ''मला वाटतं की, सीबीआयने बाकी कोणाची चौकशी करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी'', तरच काही हाताला लागू शकेल असा ही आरोप त्यांनी यावेळी केला.

देशाने काय करु नये याचं प्रात्यक्षिक गोवा देतोय

देशातील वाईट घटना कशा घडू नयेत? आणि काय करु नये? यासाठी गोवा देशाला उदाहरण देते आहे. कारण फोगाट यांच्या प्रकरणात राजकीय नेत्यांनी सरळ सरळ पुरावे हाती लागणार नाही याची काळजी घेतली आहे. म्हणून तर गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामूळे नाईलाजास्तव हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागले आहे. जे गोवा पोलिसांचे अपयश असल्याचं ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com