‘शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावठी भाजीपाला खरेदी करा’

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

राज्यातील शेतीला आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपण गोवेकर म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला भाजीपालाच खरेदी करायला हवा.

पणजी: राज्यातील शेतीला आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपण गोवेकर म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला भाजीपालाच खरेदी करायला हवा. स्वयंपूर्ण गोव्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी २०२२ पर्यंत आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नाबार्डतर्फे शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. त्यासाठी कृषी खाते, पशुसंवर्धन खाते, मस्त्योद्योग खाते आणि राज्य फलोत्पादन मंडळाने केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय) सोबत कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचे ध्येय पूर्ण करण्याचचे उद्दीष्ट समोर ठेऊन मार्ग आखणीचे काम आता पूर्ण झाले आहे. या मार्गावरून जात आपल्याला ध्येय गाठायचे आहे. हे ध्येय कोणत्याही एका नाही तर या चार खात्यांची मदत घेऊन गाठायचे आहे. आपल्या शेतीत पिकणाऱ्या आणि राज्याची स्वतंत्र ओळख असणाऱ्या प्रत्येक पिकाला आता राष्ट्रीय पातळीवरील ब्रॅण्ड बनविण्यासासाठी झटायचे असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

संबंधित बातम्या