Goa Government: आता शिपायाची नोकरीसुद्धा आयोगाकडूनच!

मुख्यमंत्री प्रमाेद सावंत : कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा कायदा करणार
 Goa Government| CM Pramod Sawant
Goa Government| CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Government: राज्यात आता गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) आणि कर्मचारी निवड आयोग (जीएसएससी) सक्रिय झाले असून यापुढील सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारावर मिळतील.

अगदी शिपायाची नोकरीसुद्धा आयोगामार्फत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. युवा दिनाच्या कार्यक्रमात ते पणजीत बोलत होते.

क्रीडा, युवा व्यवहार खाते आणि सांख्यिकी विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा आठवडा आणि युवा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, संचालक रोहित कदम, विजय सक्सेना उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत.

मात्र, त्यांना खासगी नोकरी आणि उद्योगासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहाय्य सरकार करण्यास तयार आहे. त्यामुळे युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार साहाय्य योजनेंतर्गत उद्योग उभारावेत.

सध्या अनेक क्षेत्रांमध्ये खासगी नोकऱ्या उपलब्ध आहेत. सरकारी नोकऱ्या मर्यादित असून लोकसेवा आणि कर्मचारी निवड आयोग सक्रिय केले आहेत. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही राजकारण्याच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही.

राज्यकर्ते नोकऱ्या देऊ शकत नाहीत. यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारेच सरकारी नोकऱ्या भरल्या जातील.

 Goa Government| CM Pramod Sawant
Mahadayi River: ‘सेव्ह म्हादई’ची सभा होणारच; आंदोलकांचा ठाम निर्धार

यासाठी दहावी-बारावीपासूनच लोकसेवा आयोगाच्या तयारीला विद्यार्थ्यांनी लागावे. खासगी कंपन्यांमध्ये असणाऱ्या मध्यस्थी कंत्राटदारांना यापुढे हटवण्यात येईल आणि सर्व कंपन्यांना थेट नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात येईल.

शिवाय यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांनाच कायम करावे, अशा स्वरूपाची तरतूद करण्यात येईल. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मार्चपर्यंत याबाबतचे अध्यादेश निघतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 Goa Government| CM Pramod Sawant
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी केंद्राकडून गोव्याची केवळ आश्‍वासनांवर बोळवण

जन्मदाखला आता ऑनलाईन विविध सरकारी आणि खासगी कामांसाठी लागणारा जन्माचा दाखला ऑनलाईन मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाच्या वतीने एक ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपचे अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे केवळ 25 रुपये भरून सहीचा जन्माचा दाखला मिळवता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com