डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला सरकारकडून रोख..!

मात्र आता सनबर्न फेस्टीवलवर (Sunburn Festival) प्रमोद सावंत सरकारने रोख लावला आहे.
Sunburn Festival
Sunburn FestivalDainik Gomantak

आशियातील प्रसिद्ध सनबर्न संगीत महोत्सवाची (Sunburn Festival) पर्वणी डिसेंबरात वागातोर पठारावर आशियातील सर्वात मोठा संगीत महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनबर्न फेस्टिवलचे येत्या 28 ते 30 डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता सनबर्न फेस्टीवलवर प्रमोद सावंत सरकारने रोख लावला आहे.

Sunburn Festival
डिसेंबरमध्ये सनबर्न फेस्टिवलचे आयोजन..!

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टीवलला रोख लावला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द केल्याने लाखों संगीत प्रेमींबरोबरच राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलापासून वंचित रहावे लागणार आहे. यंदाच्या महोत्सवात जागतीक किर्तीचे संगीतकार बुलझेये, ह्युमन, अर्जुन वागाले, डॉटडेट, त्याचबरोबर डीजे संजय दत्ता तसेच लोकोजेम यांचा समावेश होणार होता. कोवीड नियमावलीचे पालन करीत मर्यादित संगीत प्रेमींच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. मात्र आता हा फेस्टीवल होत नसल्याने लाखो सनबर्नप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com