‘गोवा सरकारने केला एक हजार कोटींचा घोटाळा’: आमदार विजय सरदेसाई

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

गोव्यात करण्यात येणाऱ्या रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार गुप्तपणे जुने गोवे येथील जागा कदंब पठारात समावेश करण्याचा प्रयत्न करून एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा करत आहे,

सासष्टी:  गोव्यात करण्यात येणाऱ्या रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार गुप्तपणे जुने गोवे येथील जागा कदंब पठारात समावेश करण्याचा प्रयत्न करून एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा करत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. 

सरकारने जुने गोवे येथील एला परिसर कदंब पठाराच्या पीडीएत समावेश करण्याचा निर्णय घेतलेला असून हा निर्णय येथील जुने गोवे चर्चसाठी विनाशकारी ठरणार आहे. गोवा सरकार संवर्धन क्षेत्राचा विचार करता एला परिसराचा पीडीएत समावेश करून एकूण जुने गोवेला दुबईतल्या शहराचा दर्जा देण्याचा घाट घालत असून बायंगिणी येथे येणारा कचरा प्रक्रिया प्रकल्पही पणजी शहरासाठी नसून या नवीन येऊ घातलेल्या शहरासाठी आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

संबंधित बातम्या