औद्योगिक विकासासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री सावंत

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने आयोजित बैठकीमध्ये सावंत बोलत होते.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक विकास होणे महत्त्वाचे आहे. गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी भाजीपला फलोत्पादन आणि पोल्ट्री उद्योगांमध्ये स्वावलंबन मिळवण्यासाठी उद्योगांना प्राथमिक क्षेत्राला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. (Goa Government committed to industrial development says CM Pramod Sawant)

CM Pramod Sawant
सत्तरीत काजू कलम केवळ 15 रुपयांत

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी चेंबर्स सदस्यांनी राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषक वातावरणाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकारकडून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच आहे. राज्य स्वयंपूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी प्राथमिक क्षेत्राला सर्व उद्योगांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी स्वागत केले, तर चेंबरचे अध्यक्ष अध्यक्ष राल्प डिसोझा यांनी राज्यातील उद्योगांची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, यतीन बांदोडकर, मंगिरिश पै रायकर, मनोज पाटील उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com