Goa: सरकारी महामंडळांनी आत्मनिर्भर व्हावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सरकारी महामंडळांनी (Government Corporations) आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाले पाहिजे. जनकल्याण करताना त्यानी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत.
Goa Chief Minister Pramod Sawant
Goa Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

पणजी: सरकारी महामंडळांनी (Government Corporations) आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाले पाहिजे. जनकल्याण करताना त्यानी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी येथे व्यक्त केले. राज्य सरकारच्या गोवा आर्थिक विकास महामंडळ (Goa Economic Development Corporation) या संस्थेने आज ८६ लाख २० हजार रुपयांचा लाभांश सरकारला सादर केला. महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी लाभांशाचा धनादेश वित्त मंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात उद्योजकता विकसित व्हावी यासाठी ०.५ ते २ टक्के दराने कर्ज देणारे हे देशातील एकमेव महामंडळ असावे. अभियांत्रिकी पदवी व पदविकाधारकांना सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जलसंपदा खात्याची कंत्राटाची कामे करता यावी यासाठीही महामंडळ निधी देणार आहे. स्वयंपूर्ण गोवा योजनेत महामंडळाचे अमूल्य असे योगदान आहे.

Goa Chief Minister Pramod Sawant
Goa: पणजी, म्‍हापशात पर्यटकांची रीघ, कोविड नियमांचे तीन-तेरा

तानावडे यांनी यावेळी सांगितले,की महामंडळाने एक समिती नेमली आणि त्या समितीने प्रत्येक औद्योगिक वसाहतीला भेट दिली आहे. उद्योजकांच्या पतपुरवठ्याबाबतच्या गरजा महामंडळाने जाणून घेतल्या आहेत. अर्ज केल्यापासून कर्ज मंजुरीपर्यंतची सर्व प्रक्रिया सुटसुटीत करून आठ ते पंधरा दिवसात कर्ज मिळण्याची सुविधा आता महामंडळाने उपलब्ध केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com