२ कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या कामाच्या मंजुरीचे परिपत्रक मागे 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

विविध खात्यातील २ कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या कामांसाठी वित्त खात्याची मंजुरी घेण्यासंदर्भात परिपत्रकाला मंत्रिमंडळात आक्षेप घेण्यात आल्याने हे परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

पणजी: विविध खात्यातील २ कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या कामांसाठी वित्त खात्याची मंजुरी घेण्यासंदर्भात परिपत्रकाला मंत्रिमंडळात आक्षेप घेण्यात आल्याने हे परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

त्यामुळे खात्यांना यापुढे दोन कोटी रुपयांच्या कामांसाठी वित्त खात्याची परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. गोवा सरकारने २६ नोव्हेंबर २०२० रोजी परिपत्रक काढून सर्व खात्यांना २ कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या साधनसुविधेच्या निविदा, वस्तू खरेदी व सेवा देण्यासाठी वित्त खात्याकडून मंजुरी घेणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला कामे करण्यासाठी वित्त खात्याच्या मंजुरीसाठी फाईल पाठवावी लागत होती. त्यामुळे कामांनाही विलंब होत होता. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारच्या या परिपत्रकाला सर्वांनीच आक्षेप घेऊन तो रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या