गोवा: टॅक्सी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून मोठा पोलिस फौज फाटा तैनात

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

आंदोलकांकडून कोणतेही कृत्य घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आलेला आहे.

पणजी: गेले बारा दिवस पणजीच्या आझाद मैदानावर सुरू असलेले पर्यटक टॅक्सी परवानाधारकांची आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने पावले टाकणे सुरू केले आहे. आंदोलनाचा आज बाराव्या दिवशी आंदोलकांना आझाद मैदानावर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आंदोलकांकडून कोणतेही कृत्य घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आलेला आहे.

गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या मध्यवर्ती अशा आझाद मैदानावर गेले बारा दिवस आंदोलन करणाऱ्या पर्यटक टॅक्सी परवाना धारकांना आज प्रशासनाने मैदानावर परवानगी नाकारली आहे. यामुळे आता आझाद मैदान परिसरात मोठा गोंधळ उडाला असून शेकडोच्या संख्येने आलेले पर्यटक टॅक्सी परवानाधारक आणि त्यांचे कुटुंबीय चारी बाजूच्या रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत उभे असून ते जोराने सरकारविरोधी घोषणा देत आहेत. (Goa Government deploys large police force to suppress taxi agitation)

गोवा माईल्स ही पर्यटन खात्याच्या पुढाकाराने सुरू झालेले अॅप वर आधारित टॅक्सी सेवा बंद करा या मागणीसाठी पर्यटक टॅक्सी परवानाधारक गेले बारा दिवस आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याने आपली टॅक्सी सेवा बंद ठेवलेली आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे मात्र या चर्चेला कोणतीही पूर्व अट असू नये असे सरकारचे म्हणणे आहे. गोवा माईल्स ही ॲप वर आधारित टॅक्सी सेवा आधी बंद करा नंतर चर्चा करू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.

गोव्याची अवस्था महाराष्ट्र आणि दिल्ली सारखी करायची का ?

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेली परवानगी आता मागे घेतलेली आहे. यासाठी कोरोना महामारीचे कारण प्रशासनाने दिले आहे.गेले बारा दिवस पणजीच्या आझाद मैदानावर सुरू असलेले पर्यटक टॅक्सी परवानाधारकांची आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने पावले टाकणे सुरू केले आहे. आंदोलनाचा आज बाराव्या दिवशी आंदोलकांना आझाद मैदानावर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आंदोलकांकडून कोणतेही कृत्य घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आलेला आहे.

गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या मध्यवर्ती अशा आझाद मैदानावर गेले बारा दिवस आंदोलन करणाऱ्या पर्यटक टॅक्सी परवाना धारकांना आज प्रशासनाने मैदानावर परवानगी नाकारली आहे. यामुळे आता आझाद मैदान परिसरात मोठा गोंधळ उडाला असून शेकडोच्या संख्येने आलेले पर्यटक टॅक्सी परवानाधारक आणि त्यांचे कुटुंबीय चारी बाजूच्या रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत उभे असून ते जोराने सरकारविरोधी घोषणा देत आहेत. गोवा माईल्स ही पर्यटन खात्याच्या पुढाकाराने सुरू झालेले अॅप वर आधारित टॅक्सी सेवा बंद करा या मागणीसाठी पर्यटक टॅक्सी परवानाधारक गेले बारा दिवस आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याने आपली टॅक्सी सेवा बंद ठेवलेली आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे मात्र या चर्चेला कोणतीही पूर्व अट असू नये असे सरकारचे म्हणणे आहे. गोवा माईल्स ही ॲप वर आधारित टॅक्सी सेवा आधी बंद करा नंतर चर्चा करू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेली परवानगी आता मागे घेतलेली आहे. यासाठी कोरोना महामारीचे कारण प्रशासनाने दिले आहे.

संबंधित बातम्या