sudin dhavalikar
sudin dhavalikar

गोवा: ''कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी''

फोंडा:  कोविडची महामारी राज्यात वेगाने पसरत असून पंधरा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची मागणी सातत्याने केली तरी अजून सरकार जागे होत नसल्याने आता न्यायालयानेच याप्रकरणी लक्ष घालून सुमोटो स्वेच्छा याचिकेप्रमाणे राज्यात किमान पंधरा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा आदेश गोवा सरकारला द्यावा, असे मत मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी सरकार ही बाब गंभीरपणे घेत नाही. जोपर्यंत लॉकडाऊन होत नाही, तोपर्यंत कोरोनाची साखळी तुटणार नाही. राज्यात खुद्द आमदार, मंत्र्यांकडून तसेच विविध संस्था, संघटनांकडून लॉकडाऊनसंबंधी मागणी केली जात असली तरी मुख्यमंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, हे गोमंतकीयांचे दुर्दैव असल्याचेही सुदिन ढवळीकर म्हणाले. (Goa: "Government fails to control corona")

सरकार गंभीर नसल्याने आता न्यायालयाचा हस्तक्षेपच योग्य ठरणार असून सुमोटो दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना न्यायालयानेच लॉकडाऊनचा आदेश द्यावा, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. कोरोनाच्या भीतीपोटी लोक कोविडविरोधी लस घेण्यास गर्दी करीत आहेत,या गर्दीवर सरकारचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. कोविड लसीकरणासाठी लोकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची ही गरज असून सरकार ही मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. उद्या कोरोनाचा आणखी उद्रेक वाढल्यास त्याला मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि सबंध प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहणार असल्याचेही ढवळीकर म्हणाले. लोकांच्या आरोग्याकडे खेळू नका, योग्य आणि त्वरित निर्णय घ्या, गरजूंपर्यंत योग्य शिधा पोचवा, असेही ते म्हणाले.

राज्यातील लशींचा साठा कमी  
राज्यातील लशींचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे सर्वांना या लसी पुरतील, याबाबत साशकंता आहे. अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील लोकांसाठीचे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. अजूनही पंचेचाळीस वयोगटावरील लोक अजूनही लसीकरणासाठी येत आहेत, त्यामुळे हा लशींचा साठा वाढवण्याची गरज आहे. कोरोनाच्याबाबतीत योग्य निर्णय घेण्यात सरकार आणि आरोग्य खाते कमी पडत आहे, त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगून निदान आता तरी जागे व्हा, आणि लोकांचे जीवन वाचवा, असे त्यांनी सांगितले. 

डॉक्टरच सांगतात लॉकडाऊन करा!
गोव्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने हा धोक्याचा इशारा आहे. राज्यात पन्नास टक्के बाधा होत असून आताच ही साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. खुद्द डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने सरकारकडे पंधरा दिवसांची लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे, पण अजून सरकरा ढीम्म असून निदान डॉक्टरांचे तरी ऐका, आणि आरोग्याच्याबाबतीत होणारी हेळसांड रोखा, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com