Goa: कॅसिनो सुरु करण्याबाबत सरकार अनुकूल, उद्याच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
सरकार कॅसिनो (Casino) सुरू करण्याबाबत ‘हिरवा कंदील’ देण्याच्या तयारीत आहे. Dainik Gomantak

Goa: कॅसिनो सुरु करण्याबाबत सरकार अनुकूल, उद्याच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

कॅसिनोवरील (Casino) सर्व कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले असून कॅसिनो चालकांकडून कोरोना संबंधीची योग्य ती खबरदारी घेतली जाते त्यामुळे योग्य तो प्रोटोकॉल (Protocol) पाळून कॅसिनो सुरू करण्याची परवानगी द्यायला हवी.

पणजी: गणेश चतुर्थीसाठी काढलेली कोविडविषयक (Covid-19) कडक संहिता मागे घेतल्यानंतर आता कॅसिनो (Casino) सुरू करण्यासाठी सरकार (Government) ‘हिरवा कंदील’ देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कोविडविषयक तज्ज्ञ समितीच्या (Expert Committee) बैठकीत मान्यतेसाठी प्रयत्न जारी आहेत.

सरकार कॅसिनो (Casino) सुरू करण्याबाबत ‘हिरवा कंदील’ देण्याच्या तयारीत आहे.
Goa Curfew: कसिनो व्यावसायिक Unlock च्या प्रतिक्षेतच

कोविडविषयक तज्ज्ञ समितीच्या प्रत्येक बैठकीत संहिता कडक, शिथिल करण्यासाठी चर्चा होते. गेल्या 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पर्यटन 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष डॉ. शिवानंद बांदेकर यांनी मांडला होता. भाजपच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी चतुर्थीनंतर पंधरा दिवस होईपर्यंत गट पर्यटनाविषयी निर्णय नको, अशी सूचना केली. इतर सदस्यांनीही गट पर्यटनाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला.

या बैठकीत भटजींना घरोघरी जाऊन पूजा करू न देण्याची शिफारस केली होती. सरकारने त्यासंदर्भात आदेशही जारी केला व क्षणात तो मागेही घेतला. समितीची दहावी बैठक 8 सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत फक्त गणेशोत्सव संहितेवर चर्चा झाली. सरकारने जारी केलेल्या संहितेवर मते मांडण्यात आली.

सरकार कॅसिनो (Casino) सुरू करण्याबाबत ‘हिरवा कंदील’ देण्याच्या तयारीत आहे.
Goa: कसिनो उघडणार नाहीत- डॉ.प्रमोद सावंत

उद्याच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष

येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तज्ज्ञ समिती बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भटजींना जसा मुक्त परवाना मिळाला तशीच परवानगी कॅसिनोंना देण्यासाठी समितीच्या बैठकीत प्रस्ताव येऊ शकतो किंवा 9 व्या बैठकीचे इतिवृत्त बदलण्यासाठी दबावही आणला जाण्याची भीती आहे. येत्या 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिन असून कॅसिनोंना ‘ग्रीन सिग्नल’ ही सरकारची पर्यटन क्षेत्राला भेट असेल, अशी चर्चा आहे. तज्ज्ञ समितीला पुन्हा डावलले जाऊ शकते.

राज्यातील जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. केवळ कॅसिनो बंद असून त्याचा एकूणच पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. कॅसिनोवरील सर्व कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले असून कॅसिनो चालकांकडून कोरोना संबंधीची योग्य ती खबरदारी घेतली जाते त्यामुळे योग्य तो प्रोटोकॉल पाळून कॅसिनो सुरू करण्याची परवानगी द्यायला हवी.

- श्रीनिवास नायक , संचालक, मॅजेस्टिक प्राईड.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com