Goa News: गोव्यात सरस्वतीचा संचार थांबविणाऱ्यांना बेताळच पाहून घेईल- देवदत्त पटनायक

Goa News: महोत्सवातील व्याख्याते अन् पुराणशास्त्र तज्ज्ञ देवदत्त पटनायक यांनी गोवा सरकारवर टीका करत निषेध केला.
Goa News | Devdutt Pattanaik
Goa News | Devdutt PattanaikDainik Gomantak

Goa News: डाव्या विचारसरणीच्या व्याख्यात्यांना आमंत्रण दिल्याने केंद्राच्या सांगण्यावरून यंदाचा डी. डी. कोसंबी विचार महोत्सव रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर देशभरातील बुद्धिजीवी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. काल या महोत्सवातील व्याख्याते व पुराणशास्त्र तज्ज्ञ देवदत्त पटनायक यांनी गोवा सरकारवर टीका करताना हा महोत्सव रद्द करणे म्हणजे सरस्वतीचा संचार अडविल्यासारखेच आहे, अशा शब्दांत निषेध केला.

पुढे जाऊन ते म्हणाले, ‘करावे तसे भरावे’ अशी म्हण आहे. सरस्वतीचा संचार अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गोव्यातील जागृत बेताळच पाहून घेईल. काल पटनायक यांचे डी. डी. कोसंबी महोत्सवात ‘गोव्यातील दैवते’ या विषयावर व्याख्यान होणार होते. मात्र, हा महोत्सव रद्द झाल्याने पटनायक यांनी काल ‘इन्स्टाग्राम’वर लाईव्ह व्याख्यान दिले. या व्याख्यानाचा असंख्य श्रोत्यांनी लाभ घेतला.

Goa News | Devdutt Pattanaik
Goa News: नरेंद्र गावकर यांची काले सरपंचपदी बिनविरोध निवड

या व्याख्यानात पटनायक म्हणाले, पुराणशास्त्र (मायथॉलॉजी) म्हणजे फक्त पुराण कथा नव्हेत, तर त्या त्या प्रदेशाचा तो आलेख असून त्या प्रदेशातील राहणीमान, राजकारण, अर्थशास्त्र या साऱ्यांचेपान दर्शन त्याद्वारे होते. पुराणशास्त्र फक्त लिखित स्वरूपातच मर्यादित नसून मौखिक स्वरूपात ते अधिक व्यापक आहे. मात्र, पुराणशास्त्र म्हणजे इतिहास नाही, हेही ध्यानात ठेवण्याची गरज आहे.

गोव्यातील दैवतांचा आलेख मांडताना त्यांनी येथे उत्तरोत्तर सामाजिक परिवर्तन कसे झाले, त्याचाही आलेख मांडला. सुरुवातीला गोव्यात दैवत हा केंद्रबिंदू ठेवून हा समाज एकत्रित व कुठलाही भेदभाव न करता सर्वधर्मसमभाव या तत्त्वाने वागत होता. मात्र, दोन हजार वर्षांपूर्वी उत्तरेतील ब्राह्मण व अन्य समाज गोव्यात स्थलांतरित झाला आणि स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांनी देवही वेगळे केले.

पोर्तुगीज गोव्यात आल्यावर कायदेशीररित्या या समाजाला बेदखल केले गेले. पोर्तुगिजांना महिला कला क्षेत्रात असलेल्या नको होत्या. त्यामुळे त्यांनी ‘कायदेशीर मुलांना अधिकार’ ही संकल्पना पुढे आणली. त्यावेळच्या उच्चभ्रू समाजाने त्याचाच फायदा घेत एकेकाळी स्वतंत्र असलेल्या या महिलांचे पूर्णतः खच्चीकरण केले, असा दावा पटनायक यांनी केला.

Goa News | Devdutt Pattanaik
Goa News: भगवान बिरसा मुंडा जयंतीदिनी 15 रोजी मडगावात कार्यक्रम

गोव्यातील मंदिरांवर बहामनी शैलीचा प्रभाव

गोवा (Goa) हा प्रदेश अनेक प्रकारच्या राजवटींच्या प्रभावाखालून गेल्याने गोव्यातील मंदिरांच्या स्थापत्यशास्त्रावर त्यांचा प्रभाव दिसून येतो. गोव्यातील मंदिरांचे दीपस्तंभ आणि दरवट्यावर बहामनी स्थापत्य कलेचा, तर घुमटावर पोर्तुगीज स्थापत्य कलेचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळेच भारतातील अन्य ठिकाणच्या मंदिरांपेक्षा गोव्यातील मंदिरे वेगळी आहेत, असे पटनायक यांनी सांगितले.

देवदासींनीच देव वाचविले

गोव्यात ज्यावेळी देव व मंदिरांवर आक्रमण झाले, त्यावेळी या देवदासींनीच आपला जीव धोक्यात घालून देव वाचविले. पण त्यांच्या या त्यागाची कुणीच दखल घेतली नाही. पुढे त्यांनाच मंदिर अधिकारातून बेदखल करण्यात आले, असे पटनायक म्हणाले.

जगन्नाथ पुरी, तंजावूर आणि गोवा

पवित्र आणि अपवित्र ही कारस्थानी संकल्पना देशभरात ब्राह्मणांनीच आणली. जे जगन्नाथ पुरी येथे घडले, तमीळनाडूमधील तंजावूर येथे घडले, तेच गोव्यात घडले. मंदिरांमधील महिलांचे अधिकार काढून घेण्यासाठी उच्च-नीच असा भेदभाव केला गेला. ब्रिटिश असो किंवा पोर्तुगीज, त्यांनी या कारस्थानाला पाठिंबाच दिला, असेही पटनायक यांनी सांगितले.

Goa News | Devdutt Pattanaik
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या एका क्लिकवर

हंस आणि झुरळ...

मिथ्य आणि प्रत्यक्ष वास्तव हे वेगवेगळे असते. मात्र, काहीजणांना ते तारतम्य नसते, अशा शब्दांत त्यांनी परंपरावाद्यांना फटकारले. परंपरावाद्यांना झुरळांची उपमा देताना ‘झुरळांना गटारात राहायची सवय असते आणि त्यांना तेच विश्व वाटते.’ मात्र, खरा हंस असतो, तोच दूध आणि पाणी यांच्यातील फरक ओळखतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

...म्हणून देवदासींच्या स्वातंत्र्यावर गदा

ब्राह्मण समाज गोव्यात येण्यापूर्वी देवदासी या स्वतंत्र होत्या. त्यांना लग्न न करता स्वतंत्र राहाण्याचा अधिकार होता. समाजाने त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून मंदिरांत त्यांना मोठा मान दिला होता. मात्र, नंतर दुसऱ्या ठिकाणाहून आलेल्या ब्राह्मणांनी त्यांना कमी दर्जाचे ठरवून त्यांचे स्वातंत्र्य व अधिकार काढून घेतले, असे पटनायक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com