स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची अखेर गोवा सरकारने घेतली दखल

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला आज बोलावून घेऊन तूर्त पहिल्या टप्प्यात 26 जणांना नोकरीत देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पणजी: येथील आझाद मैदानावर आपणास नोकरी मिळावी यासाठी उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या उपोषणाची दखल सरकारने आज घेतली. उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला आज बोलावून घेऊन तूर्त पहिल्या टप्प्यात 26 जणांना नोकरीत देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

22 जानेवारीपासून आपणास सरकारी नोकरी मिळावी, यासाठी तिघा स्वातंत्र्यसैनिकांसह एकूण 97 स्वातंत्र्यसैनिकांची मुले आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले. डॉ. शिवाजी शेठ यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने आर. मेनका यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले, की 97 स्वातंत्र्यसैनिकांची मुले आहेत. त्यांना नोकरी मिळायला हवी. ज्यांचे वय उलटून गेलेले आहे, त्यांना एक रकमी मोबदला मिळावा आणि इतरांना त्यांच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी मिळावी. त्यानंतर जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी गोवा सरकारकडे  258 स्वतंत्र्यसैनिकांच्या मुलांची नोंदणी असल्याचे सांगितले. त्यात उपोषण करत असलेल्यांमधील 71 जणांचा समावेश आहे. उर्वरित 26 जणांची नावे त्यामध्ये सामाविष्ट करण्यात येतील. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात 26 जणांना नोकरी देण्यात येईल. काही जणांना मानव संसाधन विकास महामंडळातर्फे नोकरीत घेण्यात येईल. इतरांच्या बाबतीत एकूणच प्रक्रिया तपासून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आर. मेनका यांनी या शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती डॉ. शिवाजी शेठ यांनी दिली.

कडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारची एकही योजना नाही -

जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेले आहे, ते आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या सहीसह लिखित स्वरूपात मिळावे, त्यानंतरच आम्ही आमचे उपोषण मागे घेऊ, असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचे डॉ . शिवाजी शेठ यांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी उपोषणाला बसलेले स्वातंत्र्यसैनिक नागेश च्यारी यांची तब्येत बरीच खालावली आणि त्यामुळे बराच गदारोळ  झाला. इतर उपोषणकर्त्यांचीही तब्येत खालावली आणि ही गोष्ट सरकार पातळीवर कळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले.

शेतकरी आंदेलन चिथावल्याचा आरोप असलेला दिप सिध्दू भाजपशी संबधित? -

संबंधित बातम्या