Goa Curfew: बाप्पांवरही कोरोनाचं सावट, कर्फ्यूत 13 सप्टेंबरपर्यंत वाढ

सामाजिक अंतराचे बंधन पाळून लोकांनी चतुर्थी साजरी करावी.
Goa Curfew
Goa CurfewDainik Goamantak

गोव्यात कर्फ्यू (Goa Curfew) लागू असूनही कोविड-19 (Covid-19) च्या मार्गदर्शक सूचनांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. केरळमध्ये (Kerala) कोविडचा धोका वाढल्याने कोरोनाविषयक तज्‍ज्ञ समितीने केरळमधून येणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची शिफारस सरकारला केली आहे. त्यामुळे ऐन गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi) सणावेळी कोरोनाच्या संकटाचे सावट कायम आहे. सरकारने 9 मे 2021 रोजी राज्यस्तरीय संचारबंदी (Curfew) लागू केली होती. जी गोव्यात (Goa) अजूनही कायमच आहे.

कर्फ्यूत वाढ

सरकारने आज पुन्हा आठवडाभर राज्यव्यापी संचारबंदीत (कर्फ्यू) वाढ केली आहे. हा कर्फ्यू येत्या 13 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचा एका ओळीचा आदेश पुन्हा एकदा जारी केला आहे.

Goa Curfew
Goa Covid-19 Update: पाच बळींमुळे वाढली चिंता; सभांमध्ये नियमांचे तीनतेरा

900 रुग्ण

सद्यस्थितीत राज्यात कोरोनाबाधित 900 रुग्ण सक्रिय आहेत, त्यातील 70 जण इस्पितळात आहेत. 8 रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू), तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे.

दोन कंटेन्मेंट झोन

लोलये पंचायत क्षेत्रात आगस व शेळी येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने या भागात कंटेन्मेंट झोन व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटियाल यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

टास्क फोर्स स्थापन

या कंटेन्मेंट झोनवर निरीक्षण ठेवण्यासाठी काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. काणकोणात शनिवारपर्यंत 93 कोरोना रुग्ण सापडले. त्यापैकी 65 रुग्ण लोलये पंचायत क्षेत्रातील आहेत.

Goa Curfew
Goa Monsoon Updates: तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मच्छीमारांना इशारा

निर्बंध पाळून चतुर्थी साजरी करा: मुख्यमंत्री

सामाजिक अंतराचे बंधन पाळून लोकांनी चतुर्थी साजरी करावी. सरकारने पर्यटन पूर्णपणे खुले केलेले नाही. चतुर्थी, दसरा आणि दिवाळीनंतरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. गोमंतकीय गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी आतुरलेले आहेत. मात्र, हा सण साजरा करताना सर्वांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे भान ठेवावे. कर्फ्यू काळात गोमंतकीयांनी चांगली साथ दिली. यापुढेही ती द्यावी. सामाजिक अंतराचे बंधन पाळून लोकांनी चतुर्थी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

कर्फ्यू फक्त कागदावरच

राज्यात कर्फ्यू फक्त कागदावरच आहे. गणेशचतुर्थी असल्याने कारवाई यंत्रणेने त्याकडे डोळेझाक केली आहे. मात्र, त्याचा परिणाम राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे होते, त्यामध्ये सरकारने उच्च न्यायालयाकडून परवानगी घेऊन कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेशाचा मार्ग खुला केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com