"रहदारीचे ग्रामीण व शहरी रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यासाठी गोवा सरकारने दिली गुप्तपणे मान्यता"

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

गोवा प्रदेश कॉंग्रेसने गोव्यातील भाजप सरकार गोव्यातील शेकडो पारंपरिक घरे, वारसा घरे, धार्मिक वास्तू आणि ग्रामीण भागात हिरवळ नष्ट करण्याचा कट आखत असल्याचा आरोप आज केला.

पणजी: गोवा प्रदेश कॉंग्रेसने गोव्यातील भाजप सरकार गोव्यातील शेकडो पारंपरिक घरे, वारसा घरे, धार्मिक वास्तू आणि ग्रामीण भागात हिरवळ नष्ट करण्याचा कट आखत असल्याचा आरोप आज केला. ४०६ कि.मी. अंतर्गत ग्रामीण रस्ते आणि मुख्य जिल्हा रस्ते, कमी रहदारीचे ग्रामीण व शहरी रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यासाठी गोवा सरकारने गुप्तपणे तत्वत: मान्यता दिली आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नमूद केले आहे.

या तत्त्वत: मंजुरीमुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जमीन ताब्यात घेऊन त्यास राष्ट्रीय महामार्गांमध्ये रुपांतर करण्याचे वैधानिक अधिकार मंजूर केले आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या दुतर्फा किमान ४५ मीटर रुंदीकरण असेल. सासष्टी आणि बार्देशमधील किती लोक आपली घरे व मालमत्ता गमावतील हे सरकारलासुद्धा ठाऊक आहे काय? असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला.

आहे. ेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या भारतमाला योजनेंतर्गत प्रस्तावित व त्यावर निर्णय घेण्यात आलेल्या प्रगती की नई गती (विकासातील नवीन वेग) या शिर्षकाच्या केंद्र सरकारच्या अहवालानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या सध्या अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या  २६२  कि.मी. मार्गावर ४०६ की. मी. अतिरिक्‍त महामार्ग बनविण्यासाठी मान्यता मिळविली आहे.  एका अंदाजानुसार सध्या अस्तित्त्वात असलेले सर्व रस्ते अंदाजे १५ मीटर रुंद गृहित धरल्यास  विस्तारासाठी लागणारी एकूण जमीन १२१ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. “हा दस्तऐवज २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता आणि म्हणूनच हे स्पष्ट झाले आहे की गोव्यातील विद्यमान आणि मागील भाजपा सरकारांच्या काळात ही योजना चालू होती आणि ती सध्याच्या आणि पूर्वीच्या सरकारला माहिती होती. तरीही कोणीही याला विरोध केला नाही! असे त्यांनी नमूद केले आहे.

 नवीन अधिसूचित राष्ट्रीय महामार्गाचा अर्थ असा आहे की गोव्यातील दाट वस्ती भागात घरे, मंदिरे, चर्च आणि वारसा संरचनांसह हजारो इमारती जमीनदोस्त केल्या पाहिजेत आणि हजारो लोक बेघर आणि भूमिहीन होतील, 

संबंधित बातम्या