"गोवा सरकारने सर्वसामान्यांवर दरवाढ लादली"

"गोवा सरकारने सर्वसामान्यांवर दरवाढ लादली"
Goa government imposes tariff hike during Kovid epidemic

पणजी: गोवा सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने प्रत्येकाला वाहन वापरावे लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सगळ्यांनाच बसला आहे. सरकारने कोविड महामारीच्या काळात दिलासा देणे अपेक्षित असताना इंधन दरवाढ लादली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी आज येथे केली. ते म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घसरले असतानाही सरकारने 207 टक्के कर आकारल्याने सध्याची इंधन दरवाढ झालेली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे आणि याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होणार आहे. सरकार एका बाजूने कल्याणकारी योजना राबवण्याचा दावा करते आणि दुसरीकडे सर्वसामान्यांना भाववाढीच्या खाईत लोटत आहे हे चुकीचे आहे. जनता आता कधी निवडणूका होत आहेत  याकडे लक्ष ठेवून आहे. येत्या निवडणुकीत सरकारला जनता धडा शिकवणार आहे. 2014 पूर्वी इंधन भाववाढ झाली होती त्यामुळे भाजपचे नेते टीका करत होते ते आज गप्प बसलेले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे आणि अशी सारी जबाबदारी सरकारवर आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com