जीवनदायिनी असलेल्या म्हदईचा गोवा सरकारने सौदा केला

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भाजपच्या पक्षांतर्गत वाटाघाटीतून गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हदईचा गोवा सरकारने सौदा केल्याचे कर्नाटकातील एका पत्रकाराने उघड केल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वैयक्तिक लाभासाठी म्हादई विकल्याचा आरोप केला आहे. 

मडगाव :  भाजपच्या पक्षांतर्गत वाटाघाटीतून गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हदईचा गोवा सरकारने सौदा केल्याचे कर्नाटकातील एका पत्रकाराने उघड केल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वैयक्तिक लाभासाठी म्हादई विकल्याचा आरोप केला आहे. 

म्हादईचा सौदा करणारे हे सरकार यंदाचा नरकासूर असून या नरकारसुराला आम्ही कायमस्वरूपी घरी पाठवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 
म्हादई विषयावर एकाच पक्षाच्या अंतर्गत वाटाघाटींची नव्हे तर सर्वपक्षीय एकमताची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन एकमताने हा विषय पुढे नेला पाहिजे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले. 

म्हादईच्या वाटाघाटीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नेहमी का हरतात असा सवालही सरदेसाई यांनी केला. प्रल्हाद जोशी हे कोळसा व खाणमंत्री आहेत. तरीही गोव्यातील खाणी सुरु का होत नाहीत असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ वैयक्तिक स्वार्थासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादई विकली असा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 
कोरोना महामारीमुळे यंदा नरकासूर दिसत नाहीत. पण, म्हादईचा सौदा केलेला मोठा नरकासूर गोमंतकियांना सहन करावा लागत आहे. या नरकासुराला आता घरी पाठवण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या