गोवा सरकारने आई म्हादाईचा केला सौदा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

गोव्यातील भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी आई म्हादईचा सौदा केला हे उघड आहे असा दावा दिगंबर कामत यांनी केला. 

मडगाव : सर्वोच्च न्यायालयात गोव्याची  बाजू  मांडणारे  वरिष्ठ  वकील  ॲड. अरविंद  दातार यांनी  गोवा सरकारचा सल्ला घेवुनच म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास  विरोध  केला नव्हता हे उघड केल्याने, गोव्यातील भाजप सरकारने आई म्हादईचा विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी  मागणी  विरोधी  पक्ष  नेते  दिगंबर  कामत  यांनी  केली  आहे. 

गोव्यातील ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरणात गौडबंगाल

म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास सर्वोच्च न्यायालयासमोर विरोध करण्यास गोव्यातील भाजप सरकारला कोणी, का व कशासाठी रोखले हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली. आता सारवासारव करण्याचे दिवस संपले असुन, गोव्यातील भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी आई म्हादईचा सौदा केला हे उघड आहे असा दावा दिगंबर कामत यांनी केला. 

गोवा विधानसभेच्या अधिवेशनात मी म्हादई प्रश्नावर लक्षवेधी सुचना दाखल केली होती. त्यावरील चर्चा चालू असताना, सरकार काहितरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आम्हांला झाली होती. सरकारने यापुर्वीच्या अधिवेशनात म्हादईवर दाखल केलेला स्थगन प्रस्ताव दाखल करुन घेतला नव्हता याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली. सरकारने लोकांच्या भावनांशी खेळणे बंद करावे व सत्य परिस्थीतीवर आकडेवारी व तथ्यांच्या आधारे माहिती जनतेसमोर ठेवावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या