यावर्षीच्या गोवा मुक्तिदिनापूर्वी गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा मानस

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोतर्फे महाराष्ट्र व गोव्यात राबविल्या जाणाऱ्या आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरणच्या लोकजागृती अभियानाच्या रथाचं आज उद्घटन करण्यात आलं.

पणजी :  पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोतर्फे महाराष्ट्र व गोव्यात राबविल्या जाणाऱ्या आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरणच्या लोकजागृती अभियानाच्या रथाचं आज उद्घटन करण्यात आलं. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज हिरवा झेंडा दाखवून या लोकजागृती अभियानाच्या रथाचं उद्‍घाटन केलं. यावेळी कोरोना लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यावर आधारित गीत सादर करण्यात आले. या अभियानाचा रथ येत्या 60 दिवसांत गोव्यातील 600 ठिकाणी जनजागृती करणार आहे.

गोवा कार्निवल: कार्निवल निमित्त पणजी महानगरपालिकेकडून दहा हजार मास्कचे मोफत वितरण

यावेळी प्रत्येक ठिकाणी आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा तसेच कोरोना लसीकरणसंदर्भात लोकांमध्ये लोकगीते व लोकनृत्यामार्फत जागृती केली जाणार आहे.  पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेतून यावर्षीच्या गोवा मुक्तिदिनापूर्वी गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा मानस आहे, यासाठी केंद्राच्या विविध योजना राज्यात तळागाळापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. पंचायतीत स्वयंपूर्ण मित्रांमार्फत या योजना लोकांपर्यत  पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे.

गोव्याचे मानांकन सुधारण्यासाठी बिझीनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन ची अंमलबजावणी

या लोकजागृती अभियानामार्फत केंद्राच्या विविध योजना तसेच लसीकरणाची जनजागृती करण्यात येणार असल्याने लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आल्तिनो - पणजी येथील जॉगर्स उद्यानाजवळ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलं.

संबंधित बातम्या