मायकल लोबाेंचे बंड कायम

दिलायलांच्या उमेदवारीचा डिसेंबर अखेरपर्यंत अंतिम निर्णय
मायकल लोबाेंचे बंड कायम
Goa Government minister Michael Lobo stands against bjpDainik Gomantak

शिवोली: मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी पक्षाच्या विरोधात पुकारलेले बंड अजूनही कायम आहे. पत्नी दिलायला लोबो या शिवोली (Siolim) मतदारसंघातून उभ्या राहण्यावर ठाम असून त्यांच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आले. दिलायला कुठल्या पक्षाच्या तिकिटावर शिवोलीतून लढणार हे शिवोलीची जनताच ठरवणार आहे. आम्ही भाजपकडे दिलायलासाठी तिकीट मागितलेले नाही. परंतु त्या शिवोलीतून स्वतंत्रपणे लढतील की एखाद्या पक्षाच्या तिकिटावर, हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होईल, असे लोबो यांनी शिवोलीत सांगितले. त्या भाजप महिला गाभा समितीच्या विद्यमान सदस्य असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांचा का विचार करू नये, असेही लोबो म्हणाले.

भाजपला दिला घरचा अहेर

सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील विधानसभा कारभाराचा आढावा घेताना लोबो म्हणाले, सरकारला विकासकामांवरून धारेवर धरणारे सक्षम आमदार सभागृहात नसल्याने प्रशासनात ठिसूळपणा आला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचा मी केलेला प्रण म्हणजे त्यांचे गोव्यासाठी असलेले स्वप्न आणि दृष्टांत पूर्ण करण्यासारखे आहे. त्यासाठी भाजपचाच असणे आवश्यक नसल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.

Goa Government minister Michael Lobo stands  against bjp
भंडारी समाज कोणाच्याही 'दावणी' ला बांधलेला नाही !

तृणमूलशी देणे-घेणे नाही

तृणमूल कॉंग्रेसचा गोव्याच्या राजकारणावर बिल्कुल प्रभाव पडणार नाही. मला तृणमूलशी काहीही देणेघेणे नाही. २५ वर्षे विकासापासून दूर राहिलेल्या शिवोलीला दूरगामी विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. स्थानिक मतदारांनी आम्हाला संधी दिल्यास पाच वर्षांत शिवोलीचा विकास करून दाखविण्याचे आश्‍वासन मंत्री लोबो यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com