खाण कंपन्यांच्या आव्हान याचिकेला सरकारचा विरोध

खाण खात्यातर्फे गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्र
खाण कंपन्यांच्या आव्हान याचिकेला सरकारचा विरोध
Mining in GoaDainik Gomantak

पणजी : खाण कंपन्यांनी राज्यातील खाण क्षेत्रे खाली करण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेला सरकारने विरोध केला आहे. या खाण कंपन्यांची मागणी मान्य करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची पायमल्ली करणे होते. त्यामुळे ते शक्य नसल्याने ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी ठाम भूमिका खाण खात्याच्या संचालकांनी सरकारतर्फे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात घेतली आहे.

राज्य सरकारने गेल्या मे महिन्यात आदेश काढून सर्व 88 खाणपट्ट्यांच्या मालकांना खाण क्षेत्रातील माल उचलण्यास 6 जूनपर्यंत मुदत दिली होती व त्यानंतर या खाणींचा मालकी हक्क सरकारचा राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. गोवा फाउंडेशनच्या दोन वेगवेगळ्या याचिकांवरील निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. त्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी खाण कंपन्यांनी सादर केलेली याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती संचालकांनी खंडपीठाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे केली होती.

Mining in Goa
महिलेवर हल्लाप्रकरणी माय-लेकीला जामीन

राज्यातील 88 खाणपट्ट्यांचे नुतनीकरण रद्द करण्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये दिला होता व खाण कंपन्यांचा या खाणपट्ट्यात असलेल्या खनिज मालाची वाहतूक करण्यास सहा महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ती वाढवून न दिल्याने काम बंद झाले होते.

सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार खाणींचा लिलाव वा खनिज महामंडळ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. या खाणी सुरू करण्यासंदर्भातच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली होती. ते गोव्यात आल्यानंतर त्वरित 4 मे 22 रोजी आदेश काढून खाण कंपन्यांना खाण क्षेत्रात असलेला माल उचलण्यासाठी 5 मे ते 6 जून 2022 पर्यंत मुदत दिली होती.

सुट्टीच्या काळात आव्हान

सरकारच्या आदेशाला न्यायालयाच्या सुट्टीच्या काळात आव्हान दिले होते. मात्र, त्यावर सुनावणी झाली नव्हती. मुदतीचा शेवटचा दिवस असताना ही याचिका गोवा खंडपीठाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी सुनावणीसाठी आली असता एका न्यायमूर्तींनी सुनावणी घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com