Third Wave of Corona: गोवा सरकारने GAD कर्मचार्‍यांना सद्गुरुंच्या योग क्रियांचा सराव करण्याचे आदेश दिले

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 मे 2021

गोवा सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सद्गुरूंच्या योगिक क्रियाचा अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक आणि श्वसन यंत्रणा बळकट होते. 

पणजी: भारतभरात शासनाने आता कोरोनाची(Third Wave of Corona) तीसरी आणि मोठी लाट येण्याचे संकेत दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार(Government) लसीकरणाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी संभव असणारे प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यापासून ते आरोग्य संकटाला तोंड देण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न करत आहेत. दरम्यान, गोवा(Goa) सरकारने एक परिपत्रक जारी करून सरकारी कर्मचार्‍यांना सद्गुरु जग्गी वासुदेव(Sadhguru) यांच्या कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी योगाक्रिया(Simha Yogic Kriya) करण्यास सांगितले आहे.(The Goa government ordered the GAD staff to Sadhgurus yoga practice)

गोवा सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग (GAD) चे सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सद्गुरूंच्या योगिक(Yoga) क्रियाचा अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक श्वसन यंत्रणा बळकट होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयानेही मूळतः सद्गुरूंचे योगक्रियेच्या ऑनलाइन  लिंक शेअर केल्या असल्याचे आर्लेकर यांनी नमूद या परिपत्रकात नमुद केले आहे.

GOA COVID-19: कोरोनाची लागण झालेल्या 638 जणांचा आरोग्य यंत्रणेला पत्ताच नाही 

एप्रिल महिन्यात गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने कर्मचार्‍यांना सद्गुरूंनी प्रभुत्व मिळविलेल्या विशेष प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या योग मुद्रांचा सराव करण्याचे निर्देश दिले होते. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव एन.के. सिन्हा यांनी दिलेल्या अधिकृत पत्रकात रोगक्रिया प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि सध्याच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी “अत्यंत शक्तिशाली” तंत्र म्हणून सदगूरूंच्या योगक्रियेचे  वर्णन केले गेले आहे. यात सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या युट्यूब व्हिडिओची लिंकही शेअर केली आहे. गोवा सरकारच्या परिपत्रकात गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या विधानाचा पुनरुच्चारही त्यात करण्यात आला आहे.

Journalist Vaccination: लसी संपत आल्या आणि सरकारला पत्रकार आठवले

“त्यांनी कोरोनो प्रकरणातील सध्याच्या आव्हानात्मक काळाला आवाहन देण्यासाठी  सिंह योगिक क्रिया खूप शक्तिशाली आहे. ही क्रिया श्वसन आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट करते आणि सध्याच्या कोरोना संकटाला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्यासाठी तयार करते. गोवा सरकारच्या परिपत्रकानुसार ही क्रिया करण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी लागतो. आणि हि योगक्रिया उपाश्यापोटी करणे गरजेचं आहे.

पहा व्हिडिओ

“सर्व अधिकारी / कर्मचार्‍यांना (एमटीएस, स्टाफ कार ड्रायव्हर्स, कंत्राटी कर्मचारी इत्यादींसह) व्हिडिओ पहा, या याोगाचा सराव करा आणि त्याचा फायदा घ्या. जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी व्हिडिओमधील सूचना काळजीपूर्वक पाळा,”असे त्यात नमूद केले गेले.

गोव्यातील 8 तालूक्यात सूरू होणार कोरोना भरतीपूर्व हॉस्पिटल्स 

संबंधित बातम्या