Goa Government: दिवाळीपूर्वी सावंत सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

Goa Government: गोवा सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे.
Goa Government | Pramod Sawant
Goa Government | Pramod SawantDainik Gomantak

Goa Government: गोवा सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली आहे. शिवाय सातव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे बँड 4600 रुपये व त्याखालील कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. दिवाळीच्या तोंडावर सरकारने ही भेट दिली आहे.

नवा महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून कर्मचाऱ्यांना लागू होणार असल्याने मागील 3 महिन्यांची त्यांना थकबाकी मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के महागाई भत्ता मिळत असून 4 टक्के त्यात वाढ झाल्याने तो आता 38 टक्के झाला आहे. जुलैपासून थकबाकीसह तो नोव्हेंबर 2022 पासून त्यांच्या वेतनात समावेश केला जाणार आहे.

Goa Government | Pramod Sawant
Kiran Kandolkar: कार्यकर्ते हाच माझा पक्ष; अन्‍य पक्षांची मला गरज नाही!

1 एप्रिल 2022 रोजी ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ग्रेड पे बँड 4600 रुपये व त्यापेक्षा कमी होता त्यांना बोनस लागू होणार आहे. हा बोनस एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षातील आहे. सरकारने काढलेला बोनससंदर्भातचा आदेश राज्यातील स्वायत्त संस्थांनाही लागू होणार आहे.

तेल कंपन्यांना मदतीचा हात

नवी दिल्ली (New Delhi) सरकारी तेल कंपन्यांना ‘एलपीजी’च्या अंशदानातून होणारा तोटा कमी करण्यासाठी एक रकमी 22 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याखेरीज रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादनाशी निगडित बोनसही मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com