Goa : स्थलांतरीत मालमत्ता प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सरकार आग्रही : जेनिफर मोन्सेरात

Goa : स्थलांतरीत मालमत्ता प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सरकार आग्रही : जेनिफर मोन्सेरात
Goa: Government proposes permanent settlement of properties

डिचोली : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मयेतील स्थलांतरीत मालमत्ता (properties) प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सरकार (Government) आग्रही आणि कटिबद्ध आहे, असे महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrat) यांनी स्पष्ट केले आहे. मयेतील आणखी ३५ जणांना ‘वर्ग-२’च्या सनदा मंजूर झाल्या असून त्यांचे वितरण केल्यानंतर मंत्री मोन्सेरात बोलत होत्या. पर्वरी येथील विधानसभा संकुलातील मंत्री मोन्सेरात यांच्या केबिनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या उपस्थितीत मंत्री मोन्सेरात यांनी मयेवासीयांना या सनदा वितरीत केल्या. मयेवासीयांना निवासी आणि शेतजमिनीसंदर्भातही सनदा मिळणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले. याकामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (Goa: Government proposes permanent settlement of properties)

स्थलांतरीत मालमत्ता प्रश्नी सरकार संवेदनशील असल्याचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी स्पष्ट करून हा प्रश्न लवकर सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेच्या सरपंच सिमा आरोंदेकर, पंच तुळशीदास चोडणकर तसेच सरकारी अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com