सर्व धार्मिक स्थळांना सरकारतर्फे आर्थिक सहाय्य: मुख्यमंत्री सावंत
महालसा नारायणी देवस्थानात मुख्यमंत्री सपत्नीक पूजाअर्चा करताना दैनिक गोमन्तक

सर्व धार्मिक स्थळांना सरकारतर्फे आर्थिक सहाय्य: मुख्यमंत्री सावंत

वेर्णा येथे श्री महालसा नारायणी देवस्थानच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Goa: वेर्णा महालसा नारायणी देवस्थान (Mahalasa Narayani Temple) हे देशातील उत्कृष्ट दर्जाचे पर्यटन स्थळ होईल यात कसलीच शंका नाही. हिंदू म्हणा मुस्लिम, क्रिश्चन म्हणा, सरकार कसलाच भेदभाव न करता प्रत्येक धर्मियांना अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आर्थिक सहाय्य सरकारतर्फे केले जाते असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी केले.

महालसा नारायणी देवस्थानात मुख्यमंत्री सपत्नीक पूजाअर्चा करताना
तृणमूल काँग्रेस परिवर्तन घडविण्यास सक्षम: आमदार गावकर

वेर्णा येथे श्री महालसा नारायणी देवस्थानच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, सुलक्षणा सावंत, आमदार विल्फ्रेड डिसोझा, देवालयाचे अध्यक्ष कमलाक्ष नाईक, माजी आमदार दामोदर नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

महालसा नारायणी देवस्थानात मुख्यमंत्री सपत्नीक पूजाअर्चा करताना
'ऑफलाइन' पद्धतीने वर्ग घेण्याची राज्यातील पालक व विद्यार्थ्यांची मागणी

सुरुवातीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वपत्नीसमवेत होम-हवना द्वारे पूजा-अर्चा केली करून या कामाचा व तद्नंतर त्यांनी दुसऱ्या कामाचे नामफलकाचे अनावरण करून या कामाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाविकांनी अशा देवस्थानच्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पुरोहितांच्या मंत्रपुष्पांजलीत सदर धार्मिक विधी उद्घाटन सोहळा पार पडला.

Related Stories

No stories found.